विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:41 PM2017-12-26T23:41:07+5:302017-12-26T23:41:18+5:30

It is time to leave education for students | विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची वेळ

Next
ठळक मुद्देकाँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे : सरकारचे चुकीचे धोरण कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एकीकडे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे शालेय दिन साजरा करणाऱ्या सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप, फिशिपचा लाभ देणे बंद केले. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे मासागवर्गीय विद्यार्थ्यांवर शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता आणि अनुसूचित जाती आघाडीचे प्रदेश अध्यक्ष डॉ.राजू वाघमारे यांनी येथे केला.
सामाजिक परिवर्तन अभियानाच्या चौथ्या टप्प्यात मंगळवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. गेल्या काही वर्षात काँग्रेसचा पारंपरिक मतदार काही प्रमाणात काँग्रेसपासून दूर जाऊन विविध पक्षात विखुरला गेला. त्यांना परत काँग्रेसच्या झेंड्याखाली आणण्यासाठी राज्यभर सामाजिक परिवर्तन अभियान राबविले जात आहे. आतापर्यंत १९ जिल्ह्यांचा दौरा पूर्ण झाला असून आता चौथा टप्पा सुरू झाल्याचे डॉ.वाघमारे यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारने २०१४ पासून मागासवर्गीयांच्या ३५६ योजना बंद केल्या आहेत. पण सत्तेला चिकटून बसलेले पक्ष त्यावर तोंडातू ब्र काढत नाहीत. समाजककल्याणच्या निधीमधून ३५०० कोटी शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी वळते केले. पण ना कर्जमाफी व्यवस्थितपणे दिली, ना मागासवर्गीयांना योजनांचा लाभ दिला. तरीही रामदास आठवले बोलत नसतील तर ते मागासवर्गियांच्या काय कामाचे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
रुग्णांचे प्राण वाचविणाºया डॉक्टरांचेच प्राण घेण्याच्या गोष्टी करणारे हंसराज अहीर असो की कर्नाटकमध्ये जाती-धर्माच्या आधारेच माणसांची ओळख असावी, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री असो, या विधानांवरून भाजप सरकार मनुस्मृती लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. या पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारी शाळा बंद करण्याचा घाट
सरकारी शाळांमध्ये मागासवर्गिय, आर्थिक कमकुवत मुले शिकतात. पण त्याच शाळा बंद करण्याचा घाट रचून सरकार मागासवर्गियांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. सुटाबुटातल्या सरकारला याचे भान नाही. त्यामुळे मागासवर्गिय समाजाला भानावर आणण्यासाठी आम्ही हे समाजिक परिवर्तन अभियान राबवत असल्याचे डॉ.राजू वाघमारे म्हणाले.

Web Title: It is time to leave education for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.