कोळसेगट्टाच्या मेळाव्यात जनजागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:12 AM2021-02-28T05:12:14+5:302021-02-28T05:12:14+5:30
मेळाव्याचे उद्घाटन रेगडी प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. उमाकांत मेश्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी घोट पोलीस मदत केंद्राचे ...
मेळाव्याचे उद्घाटन रेगडी प्राथमिक आराेग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. उमाकांत मेश्राम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी घोट पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी संदीप रोंढे होते. प्रमुख अतिथी म्हणून मंडळ अधिकारी एस.बी. शिंपी, आय.एन.वाकडे, कृषी विभागाचे मेघराज बागडे, दादाजी राठोड तसेच बालाजी कुलेटी, केशव कांदो व नागरिक उपस्थित होते. प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील योजना लोकांना समजावून सांगितल्या. तसेच नागरिकांच्या अनेक अडचणींचा निपटारा मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी युवा पिढीने दारू,खर्रा व इतर व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात वीर बाबुराव शेडमाके कबड्डी व भगवान बिरसा मुंडा व्हाॅलिबाॅल स्पर्धेतील विजेत्या संघाना बक्षीस देण्यात आले. तसेच ,नागरिकांना ७/१२ व उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार पोलीस उपनिरीक्षक जनार्धन काळे यांनी मानले. सहभाेजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.