जपानी प्रतिनिधींनी जाणली संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:29 PM2018-07-05T23:29:14+5:302018-07-05T23:29:54+5:30

जपान एशीयन असोसिएशन अ‍ॅन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.

Japanese representatives know-how culture | जपानी प्रतिनिधींनी जाणली संस्कृती

जपानी प्रतिनिधींनी जाणली संस्कृती

Next
ठळक मुद्देनागरिकांशी चर्चा : लखमापूर बोरी, महावाडा, पदाटोला, मुस्का गावाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : जपान एशीयन असोसिएशन अ‍ॅन्ड आशियन फ्रेन्डशीप सोसायटीच्या प्रतिनिधींनी धानोरा तालुक्यातील महावाडा गावाला भेट देऊन गावातील नागरिकांची संस्कृती व समस्या जाणून घेतल्या.
जपान येथील सुमिको तानाका, काझुको ओहामोटा, ताकाकी वातानाबे, अकीहिरो ताकाडा व कोहीयो योकायामा या प्रतिनिधींचा समावेश होता. त्यांनी २७ जून ते २ जुलै या कालावधीत अभ्यासदौरा केला. यादरम्यान रूदया संस्थेच्या कार्यालयाला भेट देऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. मुस्का येथील रूग्णालयाची पाहणी केली. २९ जून रोजी महावाडा गावाला भेट दिली. येथील नागरिकांनी पारंपरिक ढोलताशांच्या गजरात प्रतिनिधींचे स्वागत केले. केतकी देवगडे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. संचालक काशिनाथ देवगडे, देवानंद सोनटक्के यांनी सुध्दा आपले विचार मांडले. कार्यक्रमानंतर लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन कुकुटपालन व्यवसायाची माहिती जाणली. ३० जून रोजी लखमापूर बोरी, १ जुलै रोजी मराठी उच्च प्राथमिक शाळा पदाटोला येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डॉ. दिलीप बारसागडे, रोजा बारसागडे, जया देवगडे, पिपरे उपस्थित होते. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात स्नेहल पिपरे, वर्षा कोसमशीले, प्रियंका दरेकर, पल्लवी मारगोणवार, प्रणाती पेशने, शुभम कोमरेवार, वैभव कोडापे यांनी माहिती दिली. या अभ्यासदौऱ्यातून बºयाच नवीन गोष्टी शिकता आल्या, अशी प्रतिक्रिया जपानच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.

Web Title: Japanese representatives know-how culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.