जवानांचा सुरक्षा पदकाने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:39 PM2017-07-30T23:39:15+5:302017-07-30T23:39:32+5:30

केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन धानोरा स्थित ११३ बटालियन तर्फे २७ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

javaanaancaa-saurakasaa-padakaanae-sanamaana | जवानांचा सुरक्षा पदकाने सन्मान

जवानांचा सुरक्षा पदकाने सन्मान

Next
ठळक मुद्दे स्थापना दिनाचे औचित्य : धानोरा सीआरपीएफतर्फे कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलीस स्टेशन धानोरा स्थित ११३ बटालियन तर्फे २७ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान जवानांना आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले.
यावेळी एसजेएसपीएम कॉलेज प्राचार्य आर. पी. किरमिरे, ११३ बटालियनचे कमांडंट एन. शिवशंकर यांच्यासह सीआरपीएफचे अधिकार व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान २६ सीआरपीएफ जवान व अधिकाºयांनी रक्तदान केले. व्हॉलिबॉल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सर्वच खेळाडूंना मिठाईचे वितरण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कमांडंट एन. शिवशंकर यांनी २७ जुलै १९३९ रोजी काऊन रिप्रेझेन्टीटीव्ह पोलीस दलाची स्थापना झाली. त्यानंतर त्याचे नाव बदलवून केंद्रीय रिझर्व्ह पोलीस असे करण्यात आले, अशी माहिती दिली. उत्कृष्ट कार्य करणाºया जवानाला डी. जी. डिस्क व आंतरिक सुरक्षा पदकाने कमांडंट एन. शिवशंकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शस्त्रांच्या प्रदर्शनही ठेवण्यात आले होते.

Web Title: javaanaancaa-saurakasaa-padakaanae-sanamaana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.