जेसीबी लावून तोडली वनविभागासह महसूलच्या जमिनीवरील १४०८ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:43 AM2021-09-04T04:43:46+5:302021-09-04T04:43:46+5:30

प्राप्त माहितीनुसार, फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे ...

JCB planted and cut down 1408 trees on revenue land including forest department | जेसीबी लावून तोडली वनविभागासह महसूलच्या जमिनीवरील १४०८ झाडे

जेसीबी लावून तोडली वनविभागासह महसूलच्या जमिनीवरील १४०८ झाडे

Next

प्राप्त माहितीनुसार, फुलझेले कुटुंबीयांनी चुरचुरा या गावाजवळ जागा विकत घेतली होती. सर्व्हे नंबर १८, १९ मध्ये आपली जागा असल्याचे सांगत त्यांनी लगतच्या २७ ते २८ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यावरील झाडे जेसीबी लावून पाडली आणि ती कोणाला दिसून नये म्हणून १८ मोठे खड्डे खोदून त्याखाली गाडून ठेवल्याचे वनविभागाने केलेल्या तपासणीत आढळल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राकेश मडावी यांनी सांगितले.

गावकऱ्यांनी वेळीच या प्रकाराची तक्रार वनविभागाकडे केल्यानंतर वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी स्वत: त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. कनिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाई आणि तपासासाठी सूचना केल्या.

(बॉक्स)

दुसऱ्या दिवशी येतो, असे सांगून कुटुंब गायब

या प्रकरणी जबाब घेण्यासाठी फुलझेले कुटुंबातील तीनही सदस्यांना वनविभागाने १४ ऑगस्ट रोजी नोटीस देऊन लगेच येण्यास सांगितले. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी जबाब देण्यासाठी येतो, असे सांगून वनकर्मचाऱ्यांना परत पाठविले. पण त्यानंतर हे कुटुंब गायब झाले. जिल्हा परिषदेतील ड्युटीवरही गायत्री फुलझेले हजर नसल्याचे सांगितले जाते.

(बॉक्स)

...म्हणून वाढले वाघाचे हल्ले?

दरम्यान, ज्या चुरचुरा परिसरातील जंगलाच्या साहाय्याने वाघाचा वावर होता तेच जंगल भुईसपाट केल्यामुळे वाघाने आपला मोर्चा गावाच्या आणखी जवळ वळविला असून त्यामुळे वाघाचे हल्ले वाढले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वनजमिनीवर अशा पद्धतीने वाढत असलेले मानवी अतिक्रमणच जंगली प्राण्यांकडून होत असलेल्या हल्ल्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जाते.

Web Title: JCB planted and cut down 1408 trees on revenue land including forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.