झुणका-भाकर केंद्रामुळे महिलांना रोजगार उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:37 AM2021-08-15T04:37:20+5:302021-08-15T04:37:20+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका कार्यालय, चामोर्शी यांच्यातर्फे शक्ती स्वयंसाहाय्यता समूह मार्कडादेव बचत गटाच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी ...
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका कार्यालय, चामोर्शी यांच्यातर्फे शक्ती स्वयंसाहाय्यता समूह मार्कडादेव बचत गटाच्या वतीने १३ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या झुणका-भाकर केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी तहसीलदार जितेंद्र शिकतोडे बोलत होते.
यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे, प्रभाग समन्वयक भूपेश ठिकरे, एकनाथ सेलोटे, दिगांबर गरमळे, कृषी व्यवस्थापक प्रसिद्ध बोरकर, रवी चुनारकर, लेखापाल जीवनदास ठाकरे, विद्या गरमळे, बचतगट महिला ममता सरकार, अनिता हलदर, सुचित्रा मिस्त्री, दीपिका बिश्वास, प्रणित मंडल, मिनती मंडल, संगीता कर्मकार, शिपाली मल्लिक, आदी उपस्थित होते. सध्या तालुक्यात कुनघाडा रै, कुरूळ, येनापूर, चामोर्शी या ठिकाणी सुरू असून धार्मिक स्थळ असलेल्या मुतनूर येथे झुणका-भाकर केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचे तालुका अभियान व्यवस्थापक विनोद बोबाटे यांनी सांगितले.
130821\3816img-20210813-wa0247.jpg
झुणका भाकर केंद्राचे उद्घाटन फोटो