सैनिकांच्या बंदुकीसारखी पत्रकारांनी लेखणी चालवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:41+5:302021-08-23T04:39:41+5:30
शहरातील पत्रकार भवन नूतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन ...
शहरातील पत्रकार भवन नूतनीकरणाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, शिवसेना नेते किरण पांडव, प्रेस क्लबचे अध्यक्ष रुपराज वाकोडे, सचिव अरविंद खोब्रागडे, कोषाध्यक्ष अविनाश भांडेकर, सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश नगराळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, अनिल तिडके, नीलेश टोंगे, नगरसेवक सतीश विधाते, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, गडचिरोली या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. सरकारच्या कामाची प्रशंसा पत्रकारांच्या लेखणीतून व्हावी, पत्रकारितेच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रश्न सुटण्यासाठी मदत व्हावी, अशी अपेक्षा ना. वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रा. अनिल धामोडे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद खोब्रागडे यांनी आभार मानले. यावेळी प्रेस क्लबचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.