आलापली - एटापल्ली - कसनसूर मार्गाचा प्रवास बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:07 AM2021-03-13T05:07:10+5:302021-03-13T05:07:10+5:30

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दीपक सुनतकर यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देऊन या रस्त्यांची पक्की दुरुस्ती करावी, अशी ...

The journey on Alapali-Etapalli-Kasansur route became difficult | आलापली - एटापल्ली - कसनसूर मार्गाचा प्रवास बनला खडतर

आलापली - एटापल्ली - कसनसूर मार्गाचा प्रवास बनला खडतर

Next

नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दीपक सुनतकर यांनी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देऊन या रस्त्यांची पक्की दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. आलापल्लीपासून ते एटापल्लीपर्यंतचा रस्ता २७ किमीचा आहे. मागील ४ महिन्याअगोदर याच मार्गावरील मद्दीगुडम गावाजवळील रस्त्याची डागडुजी करण्यात आली हाेती. मात्र सर्वत्र गिट्टी उखडून असल्याने नागरिकांना रहदारीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अनेकवेळा अपघात झाल्याने किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. येलचिल गावाच्या अलीकडे पहाडीवरील रस्ता प्रचंड खराब झाल्याने पहाडी मार्गावर अपघातांचेे प्रमाण वाढले आहे. एटापल्ली ते कसनसूर मार्गजवळपास ४० किमीपेक्षा जास्त असून हा भाग अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या मार्गावर मोठ मोठे खड्डे असल्याने नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली आहे.

Web Title: The journey on Alapali-Etapalli-Kasansur route became difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.