दिवाळीचा प्रवास महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:03 AM2017-10-13T00:03:11+5:302017-10-13T00:03:55+5:30
राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाने दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने १० टक्के हंगामी भाडेवाढ केली असून सदर भाडेवाढ १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत राहणार आहे.
बहूतांश नागरिक दिवाळी सण आपल्या मूळगावी आप्तेष्टांसोबत साजरा करतात. त्यामुळे या कालावधीत प्रवास करणाºयांची संख्या वाढते. वाढलेल्या गर्दीचा फायदा उचलण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळाने साधी, जलद, रात्रसेवा बसेसच्या तिकीटात १० टक्के वाढ केली आहे. तर निमआरामच्या तिकीटात १५ टक्के व वातानुकूलीत बसच्या तिकीटात २० टक्के वाढ केली आहे. गडचिरोली विभागातील अहेरी, गडचिरोली, ब्रह्मपुरी या तीन आगारातील बसेस दरदिवशी ८८ हजार किमी धावतात. त्यापासून विभागाला दरदिवशी १८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. दिवाळीच्या हंगामात दरदिवशी तीन हजार किमीची भर पडेल. यासाठी एसटी विभागाने नियोजन केले आहे. त्याचबरोबर दरदिवशी २१ लाख रूपये उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. १४ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तीन कोटी रूपयांचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे.
दिवाळी सणादरम्यान येणाºया भाऊबिज सणामुळेही प्रवाशांची गर्दी वाढते. गडचिरोली जिल्ह्यात खासगी वाहनांची संख्या कमी असल्याने स्थानिक प्रवाशांनाही बसवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्याबाहेरील बसफेºयांबरोबरच जिल्ह्याअंतर्गतच्या फेºया वाढविण्याचेही नियोजन गडचिरोली विभागाने केले आहे. ऐन दिवाळीच्या सणादरम्यान भाववाढ केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मुख्य मार्गावर अधिक भर
चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आदी मुख्य मार्गांवर गर्दी राहत असल्याने या मार्गांवर अधिकाधिक फेºया चालविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याअंतर्गत येत असलेल्या आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, आष्टी, सिरोंचा आदी मार्गांवरही बसफेºया वाढविल्या जाणार आहेत. शाळांना सुट्या असल्याने मानव विकास मिशनच्या बसेस यासाठी कामी येणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक एसटीला भाववाढ केली असल्याने दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांनाही भाववाढीचा चटका सहन करावा लागणार आहे. वाढीव फेºयांमुळे प्रवाशांना सोयीचे होणार आहे.
चंद्रपूर मार्गावर यापूर्वी ४० बसफेºया जलद व १७ बसफेºया सर्वसाधारण होत्या. मात्र प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे लक्षात घेऊन एसटी महामंडळाने ४९ बसफेºया सर्वसाधारण केल्या असून ८ बसफेºया जलद आहेत.