जवानांकडून व्यसनमुक्तीचा संकल्प
By admin | Published: January 12, 2017 12:59 AM2017-01-12T00:59:01+5:302017-01-12T00:59:01+5:30
येथील सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या मुख्यालयात व्यसनमुक्ती अभियानांतर्गत रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अहेरीत कार्यक्रम : सीआरपीएफ बटालीयनचा पुढाकार
अहेरी : येथील सीआरपीएफ ३७ बटालीयनच्या मुख्यालयात व्यसनमुक्ती अभियानांतर्गत रविवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जवानांनी तंबाखू, दारू मुक्तीचा संकल्प केला.
कार्यक्रमाला बटालीयनचे द्वितीय कमान अधिकारी जितेंद्रकुमार, डॉ. एन. के. प्रसाद, उपजिल्हा रूग्णालयाचे वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. सी. एम. नुगली, पी. एस. ढपोला, उपकमांडंट पवनकुमार, अशोककुमार, सचिनकुमार, डॉ. समता एम. मनीषा कंचनवार, डॉ. सरोज भगत उपस्थित होते.
देशाचा सर्वांगिण विकास आणि सुदृढ राष्ट्राच्या निर्मितीकरिता व्यसनमुक्त समाज निर्माण करणे गरजेचे आहे. व्यसनांमुळे शरीर खिळखिळे होऊन समाजावरही विपरित परिणाम होतो, असे प्रतिपादन जितेंद्रकुमार यांनी केले. यावेळी जवानांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करून शपथ घेतली. दरम्यान वैैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी व्यसनांच्या दुष्परिणामावर माहिती देऊन सीआरपीएफ अधिकारी व जवानांना मार्गदर्शन केले. (तालुका प्रतिनिधी)