तीन केंद्रावर धान खरेदी प्रक्रिया ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:55 PM2018-12-26T21:55:17+5:302018-12-26T21:55:30+5:30

आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत तालुक्यातील आंधळी, नान्ही व गेवर्धा या तीन धान खरेदी केंद्राची धान साठवणूक क्षमता संपल्याने या तिनही केंद्रावरील धान खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे.

Junk purchase process at three centers jam | तीन केंद्रावर धान खरेदी प्रक्रिया ठप्प

तीन केंद्रावर धान खरेदी प्रक्रिया ठप्प

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यायी जागेची मागणी : धान साठवणूक क्षमता संपल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक कार्यालय कुरखेडा अंतर्गत तालुक्यातील आंधळी, नान्ही व गेवर्धा या तीन धान खरेदी केंद्राची धान साठवणूक क्षमता संपल्याने या तिनही केंद्रावरील धान खरेदी प्रक्रिया ठप्प झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड अडचण होत आहे.
धान खरेदीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने तत्काळ या तिनही केंद्रावरील धानाची उचल करावी अथवा सदर केंद्र परिसरात धान साठवणुकीसाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना पर्यायी जागेची मंजुरी द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून होत आहे.
महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत २०१८-१९ च्या हंगामात कुरखेडा तालुक्यात १० आविका संस्थांना धान खरेदी केंद्र चालविण्याची मंजुरी प्रदान करण्यात आली होती. अनेक संस्थांकडे धान साठवणुकीसाठी गोदामाची व्यवस्था नाही. त्यामुळे संस्थांच्या आवारातच ओट्याचे बांधकाम करण्यात आले. ओट्यावर धानाची साठवणूक करीत खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. मागील दोन महिन्यांपासून ही धान खरेदी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत गेवर्धा, आविका संस्थेच्या केंद्रावर १० हजार क्विंटल, आंधळी संस्थेच्या केंद्रावर सात हजार क्विंटल तर नान्ही संस्थेच्या केंद्रावर पाच हजार क्विंटल धानाची खरेदी आतापर्यंत झाली आहे. या तिनही आविका संस्थांची धान साठवणूक क्षमता संपलेली आहे. मात्र या तिनही केंद्रावर शेतकºयांकडून धानाची आवक अद्यापही सुरू आहे.
आविका संस्थांमार्फत महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांना याबाबतचा अहवाल सादर करीत मालाची तातडीने उचल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र धानाची उचलबाबत अद्याप कारवाई न झाल्याने या तिनही केंद्रांवरील धान खरेदी प्रक्रिया सध्या ठप्प आहे. परिणामी केंद्राच्या परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Web Title: Junk purchase process at three centers jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.