जंकास संस्थांना अधिकाधिक कूपकामे द्यावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:36 AM2021-03-20T04:36:20+5:302021-03-20T04:36:20+5:30
मडावी यांनी डॉ. मानकर यांचे गडचिरोली वनवृत्ताला रुजू झाल्याबद्दल स्वागत करून प्राथमिक जंगल कामगार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर ...
मडावी यांनी डॉ. मानकर यांचे गडचिरोली वनवृत्ताला रुजू झाल्याबद्दल स्वागत करून प्राथमिक जंगल कामगार सहकारी संस्थांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर त्यांच्याशी चर्चा केली. जंगल कामगार सहकारी संस्थांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे या संस्थांना जास्तीत जास्त कूपकामे देण्यात यावीत, तसेच विविध समस्या निकाली काढण्यासाठी सहकार्याचे धोरण ठेवावे, अशी विनंती मुख्य वनसंरक्षकांना केली. वनविभागाच्या वतीने जंगल कामगार सहकारी संस्थांच्या बाबतीत सहकार्याचे धोरण ठेवून जंकास संस्थांना ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी डॉ. मानकर यांनी दिली.
याप्रसंगी बोदली जंकासचे अध्यक्ष रामदास सुरपाम, गडचिरोली जंकासचे सचिव नीळकंठ मुंडले, खुटगाव जंकासचे सचिव तथा जिल्हा संघाचे पर्यवेक्षक देवीदास सुरपाम, नरचुली जंकासचे सचिव विनोद पोहाणे, सामाजिक कार्यकर्ते राजू मेटे, तसेच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.