विकासासाठी एकोपा जोपासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:07 AM2017-11-08T00:07:43+5:302017-11-08T00:08:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील वाकडी व परिसरातील गावाच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असून नागरिकांनी गावातील समस्या आपल्यापुढे मांडाव्यात, त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू, तसेच गावाच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकोपा जोपासावा, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले.
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील वाकडी येथे सभागृह बांधण्यात आले. या सभागृहाच्या लोकार्पणाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरखेडा नगर पंचायतीचे अध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी होते. प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, माजी पं. स. सदस्य चांगदेव फाये, वसंतराव मेश्राम, सरपंच शशिकला कुमरे, उपसरपंच टिकाराम डोंगरवार, शत्रृघ्न बावनकर, लालाजी मेश्राम, किसन उईके, डॉ. कागदे, ताराचंद ठलाल, विनायक नाट, नीलकंठ शेंडे, गुलाब कोटांगले, दिलीप किरंगे, अनिल वट्टी, किशोर लोहंबरे, सहारे, रवी सोनकुसरे, यादव सहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. गजबे यांनी मावा व तुडतुडा रोगांमुळे तसेच परतीच्या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील शेतकºयांचे नुकसान झाले आहे. या शेतकºयांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही सांगितले.
याप्रसंगी ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने आ. कृष्णा गजबे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, विलास गावंडे, चांगदेव फाये, डॉ. कागदे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वसंतराव मेश्राम, संचालन संजय मेश्राम यांनी केले तर आभार ग्रामसेवक लाटेलवार यांनी मानले.
गोपालकाल्यासह धार्मिक कार्यक्रम
कुरखेडा तालुक्यातील वाकडी येथे कार्तिकनिमित्त गोपालकाल्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमादरम्यान गावात भजन, आरती व इतर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमानिमित्त आ. गजबे यांनी हजेरी लावली होती.