केंद्र व राज्य सरकारांकडून सर्वसामान्यांना न्याय

By admin | Published: July 11, 2016 01:20 AM2016-07-11T01:20:23+5:302016-07-11T01:20:23+5:30

मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे. पंतप्रधान जनधन योजना व पीक विमा योजनेतून शेतकरी व शेतमजुरांना न्याय दिला जात आहे.

Justice of the Central and State Governments to the commoners | केंद्र व राज्य सरकारांकडून सर्वसामान्यांना न्याय

केंद्र व राज्य सरकारांकडून सर्वसामान्यांना न्याय

Next

अशोक नेते यांचे प्रतिपादन : प्रशिक्षणाला २०० कार्यकर्ते हजर
चामोर्शी : मेक इन इंडियाच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे. पंतप्रधान जनधन योजना व पीक विमा योजनेतून शेतकरी व शेतमजुरांना न्याय दिला जात आहे. याशिवाय भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत भाजपच्या वतीने वैनंगगेच्या तिरावर मार्र्कंडा येथे तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अध्यक्षस्थानी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर होते. विशेष अतिथी म्हणून भाजपचे विदर्भ संघटन सरचिटणीस रवी भुसारी, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष जमालभाई सिद्धीकी तर प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, बाबुराव कोहळे, नाना नाकाडे, सत्यनारायण मंचर्लावार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, अनिल पोहणकर, प्रकाश अर्जुनवार, प्रकाश गेडाम, अ‍ॅड. रवींद्र भागवत, चंद्रपूर जि. प. च्या अध्यक्ष संध्या गुरनुले आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Justice of the Central and State Governments to the commoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.