गैरआदिवासींच्या प्रश्नांना देऊ न्याय
By admin | Published: November 6, 2014 10:56 PM2014-11-06T22:56:09+5:302014-11-06T22:56:09+5:30
आरमोरी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आजही कायम आहेत. यामध्ये सिंचन, रस्ते, वनहक्क जमिनीचे पट्टे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओबीसींवर होत असलेला अन्याय तसेच
मोहटोला/ किन्हाळा : आरमोरी विधानसभा क्षेत्रात अनेक समस्या आजही कायम आहेत. यामध्ये सिंचन, रस्ते, वनहक्क जमिनीचे पट्टे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ओबीसींवर होत असलेला अन्याय तसेच धान उत्पादकाच्या समस्या या सर्वांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आदिवासी समाजाच्याही प्रश्नाची सोडवणूक करण्याला आपले प्राधान्य राहिल, असे मत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार कृष्णा गजबे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. आमदारकीची निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी लोकमतशी मनमोकळा संवाद साधला. राजकारणाचा व समाजकारणाचा कोणताही कौटुंबिक वारसा नसताना केवळ शालेय जीवनापासून राजकारणाची आवड होती. समाजकारण करताना अनेकांसाठी प्रसंगाला धाऊन जाणे, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे आदीतून आपला लोकांशी संपर्क येत राहिला. १० वी पर्यंतचे शिक्षण विहिरगाव येथील युवक विद्यालयात पूर्ण केल्यावर विसोरा येथील जमिनदार महादेव पाटील नाकाडे यांच्याकडेच आपले पुढचे शिक्षण झाले. याचदरम्यान नाकाडे कुटुंबाचा पोरेड्डीवारांशी याच काळात संबंध आला व या कुटुंबाशी मीही जुळलो. आता या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने आपल्याला संधी दिली आहे. या भागाच्या सर्वांगिण विकासासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. (वार्ताहर)