रूग्णवाहिका चालकांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:49 PM2019-06-23T23:49:46+5:302019-06-23T23:50:16+5:30
अहेरी उपविभागाच्या आरोग्य सेवेत शासकीय रूग्णवाहिका चालविणारे कंत्राटी चालक गेल्या अनेक वर्षांपासून चांगले योगदान देत आहे. त्यांना शासनाने न्याय दिला नाही. आता तरी शासकीय सेवेत सामावून घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र कंत्राटी वाहन चालक संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : अहेरी उपविभागाच्या आरोग्य सेवेत शासकीय रूग्णवाहिका चालविणारे कंत्राटी चालक गेल्या अनेक वर्षांपासून चांगले योगदान देत आहे. त्यांना शासनाने न्याय दिला नाही. आता तरी शासकीय सेवेत सामावून घेऊन न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र कंत्राटी वाहन चालक संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, शासकीय रूग्णवाहिका चालकांचे शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे, ही मागणी कायम आहे. या मागणीसाठी २४ जून २०१९ पासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन व महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ जून रविवारपासून कंत्राटी वाहन चालक कामबंद आंदोलन पुकारणार आहेत. याची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहिल, असे संघटनेने म्हटले आहे. कंत्राटी वाहनचालक संघटनेच्या वतीने निवेदनाची प्रत जि.प. सीईओ व डीएचओंना देण्यात आली.