मरीगुड्डम गाव विकासापासून काेसाेदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:36 AM2021-03-21T04:36:06+5:302021-03-21T04:36:06+5:30
सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षानंतर विकासापासून काेसाेदूर आहे. या गावाला ...
सिराेंचा : तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेले जंगलालगतच्या मरीगुड्डम गाव स्वातंत्र्यांच्या ७३ वर्षानंतर विकासापासून काेसाेदूर आहे. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्त्याअभावी महामंडळाची बसगाडी जात नाही. मार्गावर नाला असून या नाल्यावरील रपटा खराब झाला आहे. सातत्त्याने मागणी करूनही शासन, प्रशासनाचे या गावाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे.
मरीगुडम हे गाव मेडाराम ग्राम पंचायतींतर्गत येते. येथे ४० घरांची वस्ती असून लाेकसंख्या २०० आहे. संपूर्ण गाव शेती व्यवसायावर अवलंबून असून हे गाव आदिवासीबहुल आहे. घनदाट जंगलाच्या मधाेमध हे गाव वसलेले आहे. रस्ता बांधण्यात आला असला तरी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाटेत असलेल्या नाल्यावरील रपटा तुटलेला आहे. ताे पूर्णत: नष्ट झाला आहे. त्यामुळे येथे रहदारीची समस्या बिकट झाली आहे. तालुका मुख्यालयापासून कमी अंतरावर हे गाव असूनही या गावात विकासाचा पत्ता नाही. सरकारने बारमाही वाहणाऱ्या गावानजीकच्या नाल्यावर पुलाची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.