काेल्हापुरी बंधारे ठरणार चापलवाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:24 AM2021-06-24T04:24:53+5:302021-06-24T04:24:53+5:30

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात कन्नमवार जलाशय असूनसुद्धा धरण परिसरातील १४ गावांच्या शेतकऱ्यांना सिंचनाची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा ओरड होत ...

Kalhapuri dams will be a boon for the farmers of Chapalwada area | काेल्हापुरी बंधारे ठरणार चापलवाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान

काेल्हापुरी बंधारे ठरणार चापलवाडा परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान

Next

चामोर्शी तालुक्यातील घोट परिसरात कन्नमवार जलाशय असूनसुद्धा धरण परिसरातील १४ गावांच्या शेतकऱ्यांना सिंचनाची कोणतीही सोय नसल्याने अनेकदा ओरड होत होती. सिंचन विभागाच्या वतीने अनेकदा सर्वेक्षण करण्यात आले. धरणाचे पाणी परिसरातील गावांना देणे शक्य नसल्याने अखेर प्रशासनाने जलसंधारण विभागाच्या मार्फत शेतशिवारातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर कोल्हापुरी बंधारे निर्माण करण्याचा प्रकल्प जलसंधारण विभागामार्फत हाती घेण्यात आला.

शेती उपयोगी पाण्याच्या वापराबरोबरच भूमिगत जलपातळीत वाढ होण्यासाठी सदर कोल्हापुरी उपयुक्त ठरणार आहेत. कृत्रिम विहीर व बोरवेलमध्ये मुबलक पाणी उपलब्ध होण्याची सोय होणार आहे. त्यात गुरेढोरे वन्यप्राणी यांनाही या बंधाऱ्याचा लाभ होणार आहे. चापलवाडा, मछली, गांधीनगर, वरुर, माडेआमगाव नाल्याजवळसुद्धा दर्जेदार साखळी कोल्हापुरी बंधारा बांधण्यात येत आहे. पाणी साठवण्यासाठी बंधारा परिसरातील नाल्याचे खोलीकरण करण्याची कामे ही प्रगतीपथावर आहेत. शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. ३ मे रोजी जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. यु. शेंडे, जलसंधारण अधिकारी सलमान पठाण यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देऊन बंधाऱ्याची पाहणी केली. गावातील शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक शेतकऱ्यांच्या शंका व तक्रारीचे निराकरण गैरसमज दूर केले.

Web Title: Kalhapuri dams will be a boon for the farmers of Chapalwada area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.