कमलापूर समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:41 AM2021-07-14T04:41:48+5:302021-07-14T04:41:48+5:30

कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक ...

Kamalapur problematic | कमलापूर समस्याग्रस्त

कमलापूर समस्याग्रस्त

Next

कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सौर बॅटऱ्या गायब

आष्टी : वीज बचतीसाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौर दिवे लावले आहेत. मात्र यातील बहुतांश दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौर दिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

बायोमेट्रिक मशीन बंद; कर्मचारी बिनधास्त

कोरची : शासकीय कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंद आहेत.

एलईडी बल्ब पुरविण्याची मागणी

धानोरा : दोन वर्षांपूर्वी धानोरा तालुक्यात वीज विभागामार्फत एलईडी बल्बचा पुरवठा करण्यात आला होता. चार ते पाच हप्त्यांमध्ये रक्कम भरण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. अनेकांनी हे बल्ब खरेदी केले होते.

निराधारांचे अनुदान वाढवा

कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईमुळे प्रचंड प्रमाणात भाववाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

झुडपी जंगल शेतीला द्या

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. हे जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.

बाेगस देयके वाढली

गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिले देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करीत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अनेक दुकानदार बाेगस बिले ग्राहकांना देत आहेत.

सोनसरीत कव्हरेज गूल

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे सरल प्रणालीचे ऑनलाइन काम प्रभावित झाले आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन कामे करताना अडचणी येत आहेत.

‘तंमुसला प्रशिक्षण द्या’

गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नये, झालेच तर ते गाव पातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी तंमुसची स्थापना करण्यात आली. तंमुसचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सुकन्या योजना अनभिज्ञ

आष्टी : सुकन्या योजना अत्यंत चांगली आहे. मात्र या योजनेची माहिती ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेली नाही. ग्रामीण भागात या योजनेची जनजागृती होणे गरजेचे आहे. शासनाने ग्रामीणसह दुर्गम भागात या याेजनेची जागृती करावी, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Kamalapur problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.