खडे बुजविण्याकडे काणाडाेळा; वाहनधारकांची हाेतेय दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:41 AM2021-09-23T04:41:35+5:302021-09-23T04:41:35+5:30
भेंडाळा-अनखाेडा मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. ...
भेंडाळा-अनखाेडा मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांची मागणी आहे. परंतु ही मागणी अजूनपर्यंत रखडलेली आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले हाेते. त्यामुळे काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली;परंतु तेव्हापासून आतापर्यंत ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली.या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाले आहेत. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे. त्यामुळे ये-जा करणारी वाहने घसरण्याची भीती आहे. एवढी अडचण असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागासोबत या क्षेत्राचे लोकप्रतिनिधीसुद्धा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप या परिसरातील काही नागरिकांनी केला आहे.
बाॅक्स
अरुंद रस्त्यावर अपघाताचा धाेका
भेंडाळा-अनखोडा मार्ग हा अतिशय अरुंद मार्ग आहे. त्यामुळे मोठ्या वाहनासोबत लहान वाहनांना सुध्दा ये-जा करण्यासाठी मोठी अडचण येते. एकाच वेळी दाेन वाहने विरुद्ध दिशेने आल्यास रस्ता ओलांडता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने लवकर दखल घेऊन रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
220921\img_20210409_121129.jpg
भेंडाळा अनखोडा रस्त्यावर खड्डे पडून बारीक चुरी पडलेली दिसत आहे.