अतिक्रमणामुळे पुलाजवळ राज्य महामार्गावर काेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:32 AM2021-04-05T04:32:31+5:302021-04-05T04:32:31+5:30
देसाईगंज शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापारी नगरी असल्याने जसजशी लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आली तसतशी बाजारपेठ फुल्ल झाली. याचा ...
देसाईगंज शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यापारी नगरी असल्याने जसजशी लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आली तसतशी बाजारपेठ फुल्ल झाली. याचा फायदा घेत ठिकठिकाणी लोकांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटण्यास सुरुवात केली. रेल्वेचा भुयारी पूल आवागमनासाठी सुरु झाल्यापासून कुरखेडा टी-पाॅईंटवरुन जो फाटकाचा मार्ग होता तो बंद झाल्याने तेथे मोकळी जागा निर्माण झाली. त्याच्या विरुद्ध बाजूस कापड दुकाने असल्याने या भागातील माेकळ्या जागेतसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले दिसून येत आहे. अवजड व माेठ्या वाहनांमुळे गंभीर अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील अतिक्रमण लवकर हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
भुयारी पुलाजवळून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. लक्ष विचलित झाल्यास अपघाताचा धाेका असताे. यातच अतिक्रमणामुळे पुन्हा धाेका वाढला आहे.
बाॅक्स .....
अवजड वाहनांमुळे अपघाताचा धाेका
भुयारी पुलाच्या वळणावर अनेकजण दुकाने लावून बसत असल्याने एस.टी.बसेस, मालवाहू ट्रक व चारचाकी गाड्या फिरण्यास अडचणी येत आहेत. या भागात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याने वाहतूक काेंडीची समस्यासुद्धा निर्माण झाली आहे. अवजड व माेठ्या वाहनांमुळे अपघात हाेण्याचा धाेका आहे.