काेणी सेफ्टी पिन गिळताे, तर काेणाच्या नाकात शेंगदाणा व गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:41 AM2021-09-12T04:41:57+5:302021-09-12T04:41:57+5:30
गडचिराेली : लहान मुलांना सांभाळणे हे सध्या तरी कठीण काम झाले आहे. ते कधी काय करतील, हे सांगणे कठीण ...
गडचिराेली : लहान मुलांना सांभाळणे हे सध्या तरी कठीण काम झाले आहे. ते कधी काय करतील, हे सांगणे कठीण आहे. काेणी सेफ्टी पिन गिळताे तर कुणाच्या नाकात शेंगदाणा, गहू गेल्याच्या अनेक घटना जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. अशा घटना हाेऊ नयेत, यासाठी लहान मुलांची अधिकाधिक काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्यावर नेहमी पालकांनी लक्ष ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिला आहे.
लहान मुलांना काेणत्या वस्तूपासून काय धाेका आहे, ते कळत नसल्याने त्यांना सांभाळणे गरजेचे असते. घरातील सदस्यांचे लक्ष नसताना मुले काही तरी वस्तू गिळून घेतात. त्यामुळे पालकांची नजर असणे गरजेचे आहे.
बाॅक्स...
ओपीडीतूनच झाला उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयात कान, नाक, घशाची समस्या असलेले अनेक रुग्ण येतात. शिवाय सेफ्टीपिन तसेच इतर वस्तू टाकणारे बालकही अनेक येतात. यावर ओपीडीतूनच उपचार झाला आहे.
.............
मुले काय करतील याचा नेम नाही
- मुलांनी नाणे गिळल्याचे प्रकार अनेकदा उघडकीस येत असतात. कागदाला जाेडण्याची पिन गिळल्याचे उदाहरण आहे.
- काही मुले घड्याळातील गाेल आकाराचा लहान सेल गिळतात. हा सेल पाेटात जाणे धाेकादायक असते. यातून अन्ननलिकेला धाेका निर्माण हाेताे.
.............
अशी घ्या मुलांची काळजी
- सेफ्टी पिन, नाणे गिळता येतील, अशा वस्तूंपासून लहान मुलांना दूर ठेवले पाहिजे.
- आगीपासून लहान मुलांना दूर ठेवावे. हिटर, गॅस, चुलीजवळ बालकांना खेळू देऊ नये.
- पाण्याचा टप, टाकी यापासून पालकांनी दूर ठेवावे.
काेट....
लहान मुले, कान व नाकात चनाडाळ, शेंगदाणा, गहू आदी वस्तू टाकतात. काहीजण पैशाचे छाेटे शिक्के गिळतात. संबंधित बालकाला बेशुद्ध करूनच हे शिक्के काढावे लागते. आपण काय करताे, हे लहान मुलांना समजत नाही. त्यामुळे पालकांनी सेफ्टी पिन, पैसे व तत्सम वस्तूंपासून मुला-मुलींना दूर ठेवावे.
- डाॅ. अजय कांबळे, कान, नाक, घसा तथा कॅन्सर तज्ज्ञ, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली