काेराेना, माेबाइलवेडाने उडविली झाेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:24 AM2021-06-27T04:24:13+5:302021-06-27T04:24:13+5:30

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. ...

Kareena, blown up by Mabelveda | काेराेना, माेबाइलवेडाने उडविली झाेप

काेराेना, माेबाइलवेडाने उडविली झाेप

Next

काेराेना काळात अनेकांचा राेजगार हिरावल्या गेला. अनेकांचे व्यवसाय बुडाले. त्यामुळे जीवन कसे जगावे अशी सतत चिंता व्यक्तीला सतावत राहते. जेथे चिंता तेथे झाेप येत नाही. असे म्हटले जाते. झाेपण्याचा प्रयत्न केला तरी झाेप येत नाही. काही व्यक्तींना माेबाइलचा छंद लागला आहे. थाेडाही वेळ मिळाला तरी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाॅट्सॲप, ट्विटर यांचे अपेडेट बघितले जातात. रात्री उशिरापर्यंत माेबाइल बघितला जाते. सकाळी कामावर जाण्यासाठी नियाेजित वेळेवर उठावेच लागते. अशावेळी झाेप पुरेशी हाेऊ शकत नाही. सातत्याने पुरेशी झाेप न झाल्याने त्याचे माेठे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात.

बाॅक्स

झाेप कमी झाल्याचे दुष्परिणाम

- हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो.

- राेगप्रतिकारशक्ती कमी हाेते.

- दिवसा फ्रेश वाटत नाही.

- वजन वाढण्याचा धाेका बळावते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

झाेप का उडते

- काेराेना काळात अनेकांचा राेजगार गेला. त्यामुळे जीवन कसे जगावे, अशी सतत चिंता भासत राहते.

- लाॅकडाऊनमुळे मित्र व नातेवाइकांना भेटणे अशक्य झाले. सतत घरीच राहल्यामुळे सामाजिक दुरी निर्माण झाली आहे.

- दैनंदिन जीवनक्रम बदलला आहे. सकाळी उठायची चिंता नसल्याने रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने झाेप कमी हाेते.

-घरच्या घरी राहल्यामुळे माेबाइल व टीव्ही पाहण्याचा अतिरेक झाला आहे.

-माेबाइल, टीव्ही, लॅपटाॅप, संगणक यांच्यामधून निळा लाइट निघते. ताे डाेळ्यांवर पडल्याने मेंदूतून स्त्रवणाऱ्या मेलॅटाेटीनी या हार्माेन्सचे प्रमाण कमी हाेते. त्यामुळे झाेप येत नाही.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

बेडरूमला ऑफिस बनवू नका

काेराेनामुळे काही जणांना घरूनच काम करावे लागत आहे. काही जणांनी बेडरूमला ऑफिस बनविले आहे. त्यामुळे बेडरूममधील शांतता धाेक्यात आली आहे. परिणामी स्वत:ची व इतरांचीही झाेप माेड हाेत आहे.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी नकाे

झाेप येणे ही मेंदूशी संबंधित क्रिया आहे. मेंदू हा शरीराचा अतिशय संवेदनशील भाग आहे. झाेपेच्या गाेळ्या थेट मेंदूवर परिणाम करतात. त्यामुळे थाेडाही फरक पडला तरी त्याचे माेठे दुष्परिणाम हाेऊ शकतात. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय झाेपेची गाेळी घेऊ नये.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

नेमकी झाेप किती हवी

नवजात बाळ-१६ ते १८ तास

१ ते ५ वर्ष-१० ते १२ तास

६ ते १२- ९ ते ११ तास

१३ ते १८- ८ ते १० तास

१९ च्या पुढे ६ ते ८ तास

काेट

सुदृढ ओेराेग्यासाठी पुरेशी झाेप येणे महत्त्वाचे आहे. मात्र काेराेनामुळे गेलेला राेजगार, बुडालेला व्यवसाय यामुळे चिंता निर्माण झाली आहे. चिंतेमुळे झाेप लागत नाही. माेबाइल वापराचा अतिरेक झाला आहे. त्यामुळे झाेप लागत नाही. नागरिकांनी बिघडलेली दिनचर्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करावा. सगळ्यांनी नियमित व्यायाम करावा. व्यायामामुळे शरीर थकले की झाेप येईल. माेबाइलचा अतिरेक टाळावा.

सातत्याने पुरेशी झाेप हाेत नसेल तर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डाॅ. प्रशांत कारेकर, फिजिशिअन, जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिराेली

Web Title: Kareena, blown up by Mabelveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.