काेराेना संकटामुळे लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:19 AM2021-09-02T05:19:38+5:302021-09-02T05:19:38+5:30
गडचिराेली : लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण. हा क्षण कायमचा स्मरणात राहावा, यासाठी माेठ्या थाटामाटात विवाह कार्य ...
गडचिराेली : लग्न म्हणजे आयुष्यातील आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण. हा क्षण कायमचा स्मरणात राहावा, यासाठी माेठ्या थाटामाटात विवाह कार्य पार पाडले जात आहेत. काेराेना निर्बंधामुळे व आर्थिक परिस्थितीत बराच बदल झाल्याने लग्नकार्याचे स्वरूप काहीसे बदलले आहे. शिवाय उपवर, वधूंच्या लग्नाबाबतच्या अपेक्षाही बदलल्या आहेत.
काेराेनाचे संकट येण्यापूर्वी गडचिराेली जिल्ह्यात श्रीमंत व सधन कुटुंबातील मुला-मुलींचे लग्न अतिशय धुमधडाक्यात व थाटामाटात पार पडत हाेते. मात्र, काेराेनाच्या पार्श्वभूमीवर लग्न साेहळ्यावर नियम लादण्यात आले. या नियमांमुळे अनेक वधू-वरांना आपल्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरावे लागल्याने त्यांचा हिरमाेड झाला.
लग्न म्हटले की, वरात जाेरदार गाजवायची. हळदीच्या कार्यक्रमाला धिंगाणा घालायचा, खूप नाचायचे, माैज, मस्ती करायची, असे स्वप्न वर, वधूंचे मित्र-मैत्रिणी बघत असतात. मात्र, काेराेनामुळे लग्नकार्याचे स्वरूप बदलले आहे. शिवाय मुलं, मुली पाहण्याचा कार्यक्रम, लग्न जुळविण्याच्या पद्धती, त्यासाठीची नाेंदणी यातही काहीसा बदल झालेला दिसून येत आहे.
बाॅक्स .....
या अपेक्षांची पडली भर
- उपवर, वधूंच्या एकमेकांकडून भावी साथीदार म्हणून अनेक अपेक्षा आहे. काेराेना संकटामुळे व्यवसाय डबघाईस आले आहेत. असे असले तरी शहरी भागात व्यवसाय असावा.
- खासगी नाेकरी असली तरी ती चांगल्या वेतनाची असावी. घरी थाेडीफार शेती असावी. जेणेकरून ती हक्काची राहील.
बाॅक्स .....
या अपेक्षा झाल्या कमी
- काेराेना संकटामुळे विवाह कार्यावर बरेच निर्बंध आले. त्यामुळे विवाह छाेट्याशा हाॅलमध्ये किंवा घरासमाेरील खुल्या मैदानात झाले तरी हरकत नाही.
- मुलांचा कामाच्या किंवा नाेकरीच्या ठिकाणी स्वत:चे घर नसले तरी हरकत नाही.
- मुलगा निर्व्यसनी व प्रामाणिक मार्गातून कमावता असावा.
काेट ..
वधू -वर सूचक मंडळाचे पदाधिकारी म्हणतात....
संताजी साेशल मंडळातर्फे तेली समाजातील उपवर वधूंचे लग्न जुळविण्यासाठी व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून ऑनलाईन नाेंदणी केली जाते. काेराेना संकटामुळे अनेकांनी धडा घेतला आहे. उपवर वधूंच्या अपेक्षा आता काहीशा कमी झाल्या आहेत.
- प्रा. देवानंद कामडी
श्री संताजी जगनाडे महाराज सेवा समिती आरमाेरी अंतर्गत तेली समाज वर-वधू परिचय संघ स्थापन करण्यात आला आहे. लग्नासाठी इच्छुक युवक-युवती या माध्यमातून नाेंदणी करीत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून आमचे हे सामाजिक काम सुरू आहे.
- दिलीप जाैंजाळकर