काेराेना अद्याप गेला नाही; या पाच चुका केल्यास तिसरी लाट अटळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:26 AM2021-06-05T04:26:09+5:302021-06-05T04:26:09+5:30

गडचिराेली : लाॅकडाऊनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला थाेडीफार गती देण्यासाठी शासनाने १ जूनपासून काही प्रमाणात अनलाॅक केले आहे. दुकाने उघडी हाेताच ...

Kareena hasn't gone yet; If you make these five mistakes, the third wave is inevitable! | काेराेना अद्याप गेला नाही; या पाच चुका केल्यास तिसरी लाट अटळ!

काेराेना अद्याप गेला नाही; या पाच चुका केल्यास तिसरी लाट अटळ!

Next

गडचिराेली : लाॅकडाऊनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला थाेडीफार गती देण्यासाठी शासनाने १ जूनपासून काही प्रमाणात अनलाॅक केले आहे. दुकाने उघडी हाेताच बाजारपेठेत पुन्हा गर्दी उसळत आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर नागरिकांनी ज्या चुका केल्या त्यामुळे दुसरी लाट आली. दुसरी लाट ओसरत चालली आहे. पुन्हा चुका केल्यास तिसरी लाट अटळ असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. काेराेनाचे संकट लक्षात घेऊन राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात लाॅकडाऊन जाहीर केले आहे. तब्बल दीड महिना अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर दुकाने बंद हाेती. लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून आला. दीड महिन्यानंतर दुसरी लाट ओसरायला सुरुवात झाली आहे. मात्र, काेराेनाचे संकट पूर्णपणे गेले नाही. दीड महिना दुकाने व इतर व्यवहार ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेवर फार माेठा परिणाम झाला. अर्थव्यवस्थेला थाेडीफार गती देण्याच्या उद्देशाने १ जूनपासून शासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, दुकाने सुरू हाेताच पहिल्या लाटेत केलेल्या चुका पुन्हा दुसऱ्या लाटेत नागरिकांकडून केल्या जात आहेत. त्यामुळे पुन्हा काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१ पहिल्या अनलाॅकनंतर बाजारपेठेत गर्दी उसळली हाेती.

२ अनेकांनी बाहेर पडताना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंद केला.

३ ग्रामीण व शहरी भागात कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली.

४ काेराेनाचा संसर्ग झाल्यानंतरही चाचणी करण्यास तयार नव्हते.

५ बाजारपेठेतून घरी गेल्यानंतर फारशी काळजी घेतली जात नव्हती.

बाॅक्स.....

नागरिकांची जबाबदारी महत्त्वाची

१) काेराेनाचा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रत्येक नागरिकामध्ये जागृती करण्यात आली आहे. त्यामुळे नियमानुसार वागणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

२) दुपारी २ वाजेपर्यंत बाजारपेठ उघडी राहते. तरीही काही नागरिक अनावश्यक फिरत असल्याचे दिसून येते. काेराेनाचे संकट अजूनही गेले नाही, याची पक्की जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे.

३) काेराेनामुळे हाेणारे मृत्यू टाळण्यासाठी लस घेणे हा प्रभावी उपाय मानला जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी प्रशासनामार्फत जागृती केली जात आहे. लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

४) काेराेनाचे नियम पाळण्याच्या अटीवर दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दुकानामध्ये गर्दी हाेणार नाही, याची खबरदारी दुकानदारांना घ्यावी लागणार आहे. अन्यथा पुन्हा दुकाने बंद करण्याची वेळ येईल.

५) शासकीय कार्यालयांमधील कर्मचारीही काेराेनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. त्यांनीसुद्धा खबरदारी घेण्याची गरज आहे.

बाॅक्स ...

पहिला अनलाॅक दुसरा

४ ऑगस्ट २०२० दिनांक १ जून २०२१

६४४ एकूण काेराेना रुग्ण २९,३९६

१ एकूण मृत्यू ७१९

Web Title: Kareena hasn't gone yet; If you make these five mistakes, the third wave is inevitable!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.