काेराेनाने घेतला दाेघांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:37 AM2021-04-04T04:37:55+5:302021-04-04T04:37:55+5:30
एकूण बाधितांची संख्या १० हजार ८६६ एवढी झाली आहे. १० हजार २१८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ५३५ ...
एकूण बाधितांची संख्या १० हजार ८६६ एवढी झाली आहे. १० हजार २१८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ५३५ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०४ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ४.९२ टक्के, तर मृत्यू दर १.०४ टक्के झाला.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साईनगर १, चनकाई नगर १, बेलगाव २ , झेप्रा १, गोगाव २, चामोर्शी रस्ता १, मेडिकल कॉलनी १, सोनापूर कॉम्पलेक्स १, कॅम्प ऐरीया २, शाहू नगर १, नवेगाव १, पोलीस कॉलनी २, लांझेडा १, सुभाष वाॅर्ड ३, मेंढा २, ओम नगर ८, कन्नमवार वार्ड ३, स्थानिक १ अहेरी तालुक्यांतील आलापल्ली १, आरमोरी तालुक्यातील विद्या नगर २, स्थानिक २, कुरखेडा तालुक्यातील गुरुनोली १, स्थानिक १, चामोर्शी तालुक्यातील इलूर १, स्थानिक २, धानोरा तालुक्यातील चातगाव १,येरंडी १, स्थानिक ४, भामरागड तालुक्यातील स्थानिक २, एटापल्ली तालुक्यातील स्थानिक ३, देसाईगंज तालुक्यातील हनुमान वार्ड १, विसोरा २, कस्तुबा वार्ड १, तर इतर जिल्ह्यातील चारजणांचा समावेश आहे.
बाॅक्स
६३ पैकी गडचिराेलीतील ३८ जण
शनिवारी जिल्हाभरात ६३ काेराेनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ३८ जण एकट्या गडचिराेली तालुक्यातील आहेत. त्यातही बहुतांश बाधित गडचिराेली शहरातील आहेत. काेराेनावर नियंत्रण ठेवण्यासाठी गडचिराेली शहरातील रुग्ण संख्येवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. तसेच अहेरी तालुक्यात १, आरमोरी ४, भामरागड २, चामोर्शी ३, धानोरा तालुक्यांतील ६, कुरखेडा २, एटापल्ली ३, तर देसाईगंज तालुक्यातील चारजणांचा समावेश आहे.