काेराेना बाधितांनी गाठला ३० हजारांचा पल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:26 AM2021-06-18T04:26:05+5:302021-06-18T04:26:05+5:30

कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३० हजार ४ झाली आहे. त्यापैकी ...

Kareena's victims reached the level of 30,000 | काेराेना बाधितांनी गाठला ३० हजारांचा पल्ला

काेराेना बाधितांनी गाठला ३० हजारांचा पल्ला

Next

कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३० हजार ४ झाली आहे. त्यापैकी २८ हजार ९८७ जणांनी काेराेनावर मात केली आहे.

सध्या २८० सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३७ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के असून, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ०.९३ टक्के, तर मृत्यू दर २.४६ टक्के झाला. नवीन २६ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ६, अहेरी तालुक्यातील ५, आरमोरी १, चामोर्शी तालुक्यातील ६, धानोरा तालुक्यातील २, एटापल्ली तालुक्यातील १, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ४, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये १ जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या ५७ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १०, अहेरी ४, आरमोरी २, भामरागड ५, चामोर्शी १५, धानोरा २, मुलचेरा ८, सिरोंचा ८, देसाईगंज येथील ३ जणांचा समावेश आहे.

Web Title: Kareena's victims reached the level of 30,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.