काेराेनाची लाट ओसरू लागली, नाेकरीही जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:44 AM2021-06-09T04:44:37+5:302021-06-09T04:44:37+5:30
दुसऱ्या लाटेत सुमारे २० हजार नागरिकांना काेराेनाची लागण झाली. एकाचवेळी चार हजार रुग्ण उपचार घेत हाेते. एवढ्या माेठ्या प्रमाणातील ...
दुसऱ्या लाटेत सुमारे २० हजार नागरिकांना काेराेनाची लागण झाली. एकाचवेळी चार हजार रुग्ण उपचार घेत हाेते. एवढ्या माेठ्या प्रमाणातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी नियमित कर्मचारी अपुरे पडत हाेते. त्यामुळे शासनाने डाॅक्टर, परिचारिका, मदतनीस यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यास परवानगी दिली हाेती. त्यांची नियुक्ती केवळ काेराेनाची लाट असेपर्यंतच आहे. जिल्हाभरात जवळपास १५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, आता लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. सध्या केवळ ५०० रुग्ण उपचार घेत आहेत. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी कमी हाेण्याची शक्यता आहे. त्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम संपणार आहे. त्यामुळे त्यांना आता कामावरून कमी केले जाण्याची शक्यता आहे.
बाॅक्स
जीवावर बेतणारे काम केले
-कंत्राटी कर्मचाऱ्यांनी नियमित कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काेराेना काळात सेवा दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांचे जीव वाचले व दुसरी लाट ओसरण्यास मदत झाली आहे.
-काेराेनाच्या रुग्णाला घरचे कुटुंबीय परके करतात. या रुग्णाला आराेग्य सेवा देऊन त्याला आवश्यक त्यावेळी मदत करण्याचे काम केले आहे.
- मदतनीस म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला १४ हजार रुपये मानधन दिले जात हाेते. काेराेनाच्या संकटात राेजगार मिळाला. त्यावर कुटुंबाचा चरितार्थ चालत हाेता. आता मात्र दुसरा राेजगार शाेधण्याची वेळ आली आहे.
काेट
काेराेनाच्या पहिल्या लाटेतही आपण काम केले आहे. पहिली लाट ओसरल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले हाेते. या कालावधीत दुसरा राेजगार न मिळाल्याने बेराेजगारच राहावे लागले हाेते. दुसऱ्या लाटेत पुन्हा दाेन महिन्यांचा राेजगार मिळाला. आता हाही राेजगार हातून जाण्याची शक्यता आहे. - कंत्राटी मदतनीस
काेट
काेराेना काळात अनेकांचे जीव वाचविले. याचा आपल्याला आनंद आहे. मात्र, काेराेनाची लाट ओसरताच आपला राेजगार जाणार आहे. याचे शल्य मनात आहे. आता तिसऱ्या लाटेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. आराेग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर अनेक जागा निघतात. त्यात आम्हाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
कंत्राटी, आराेग्य कर्मचारी
.............................................................................................................
जिल्ह्यातील काेविड केअर सेंटर- ११
चालू असलेले सेंटर-११
कंत्राटी स्टाफ- १५०