कार्यालये व्यसनमुक्त ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:45 AM2019-01-16T01:45:31+5:302019-01-16T01:45:53+5:30
स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय खर्रा व दारूमुक्त ठेवणे ही प्रत्येक कर्मचाºयांची जबाबदारी आहे. कार्यालयात कुणीही व्यसन करताना आढळून आल्यास संबंधित कर्मचाºयावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करणार, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वत: व्यसनमुक्त राहून आपले कार्यालय खर्रा व दारूमुक्त ठेवणे ही प्रत्येक कर्मचाºयांची जबाबदारी आहे. कार्यालयात कुणीही व्यसन करताना आढळून आल्यास संबंधित कर्मचाºयावर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई करणार, असा इशारा निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्व विभागातील कर्मचाºयांसाठी सोमवारी मुक्तिपथद्वारे दारू व तंबाखूमुक्त कार्यालय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर दामोधर नान्हे यांच्यासह ७० कर्मचारी उपस्थित होते. मुक्तिपथ चे संचालक डॉ. मयूर गुप्ता आणि उपसंचालक संतोष सावळकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यालय दारू व तंबाखूमुक्त ठेवण्याचा निर्धार करून व्यसनमुक्तीचा संकल्प कर्मचाºयांनी केला. जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालय, दवाखाने, शाळा २६ जानेवारीपर्यंत दारू आणि तंबाखूमुक्त करण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून मुक्तिपथ जिल्हा कार्यालयाद्वारे सदर कार्यशाळा घेण्यात आली. सर्वप्रथम खर्रा सेवन केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम सांगणारा ‘यमराजाचा फास’ हा लघुचित्रपट दाखवून त्यावर चर्चा करण्यात आली. कार्यालय दारू आणि तंबाखूमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ११ निकषांची माहिती संतोष सावळकर यांनी कर्मचाºयांना दिली. त्याचबरोबर कोटपा कायद्याची माहितीही देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये या कार्यशाळा मुक्तिपथ चमुद्वारे घेतल्या जात आहेत.
मुक्तिपथच्या वतीने गावागावांतही दारू व तंबाखू मुक्तिबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयांतही प्रबोधनात्मक कार्यक्रम होत आहेत.