ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:39+5:30

यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा.नेते यांनी जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांच्याशी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रा.देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, सुधाकर लाकडे, गोपिनाथ चांदेवार, सुधाकर दुधबावरे, भाऊसाहेब समरित आदी उपस्थित होते.

Keep separate filings for OBCs | ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवा

ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना ठेवा

Next
ठळक मुद्देखासदारांना साकडे : मागास शोषित संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सन २०२१ च्या जनगणना नमूना प्रश्नावलीत ओबीसीचा उल्लेख करून मागासवर्गाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी भारतीय मागास (ओबीसी) शोषित संघटनेच्या वतीने खा.अशोक नेते यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खा.नेते यांनी जनसंपर्क कार्यालयात जाऊन त्यांच्याशी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेबाबत चर्चा केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी प्रा.देवानंद कामडी, सुरेश भांडेकर, सुधाकर लाकडे, गोपिनाथ चांदेवार, सुधाकर दुधबावरे, भाऊसाहेब समरित आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक वर्षापासून ओबीसी तसेच व्ही.जे., एन.टी, एसबीसी आदींची जनगणना सरकारच्या वतीने करण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसींसह या सर्व मागास प्रवर्गावर अन्याय झाला आहे. त्यामुळे आता २०२१ च्या जनगणनेत ओबीसी व या मागास प्रवर्गासाठी स्वतंत्र रकाना ठेवण्यात यावा, जेणेकरून या प्रवर्गाच्या लोकसंख्येचा तंतोतंत आकडा सरकारसह सर्वांपुढे येईल, असे म्हटले आहे.

Web Title: Keep separate filings for OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.