कारभारात पारदर्शकता ठेवा

By admin | Published: August 3, 2014 11:23 PM2014-08-03T23:23:37+5:302014-08-03T23:23:37+5:30

सहकारी संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी संस्थांचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालण्यासाठी या संस्थांच्या कारभारात

Keep transparency in governance | कारभारात पारदर्शकता ठेवा

कारभारात पारदर्शकता ठेवा

Next

वैरागड : सहकारी संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी संस्थांचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालण्यासाठी या संस्थांच्या कारभारात गतिमानता व पारदर्शकता आणावी असे आवाहन माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले.
वैरागड जंगल कामगार सहकारी संस्थेच्यावतीने सन २०१० ते १२ या वर्षातील कुप अंतिम हिशोबापोटी १० टक्के समाजकल्याण अधिदान रकमेतून संस्थेच्या सभासदांना गॅसचे वितरण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हा कामगार सहकारी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, जिल्हा कामगार संघाचे सचिव एम. झेड. जांभुळकर, प्रा. पी. आर. आकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख हरीष मने, नकटू पुराम, माणिक सिडाम, भाष्कर बोडणे, केशव गेडाम, सदाशिव आकरे, संस्थेचे संचालक तुकाराम जुमनाके, फागो चौके, पितांबर लांजेवार, सुखदेव बोडणे, सुनंदा वट्टी, एम. के. खोब्रागडे, श्रावण नागोसे, पोलीस पाटील गोरख भानारकर, भजन कन्नाके आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना खा. कोवासे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात आघाडीवर आहे. जे उद्योगधंदे एका व्यक्तीला स्थापन करणे शक्य होत नाही. असे उद्योग सहकाराच्या माध्यमातून स्थापन केले जाऊन अगदी यशस्वीपणे चालविले जात आहेत. मात्र यासाठी सहकारी संस्थांच्या व्यवहारामध्ये गतीमानता व पारदर्शकता असणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा या संस्थांवरचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. जंगल कामगार सहकारी संस्थेनेही या बाबीचे भान ठेवले पाहिजे. आजपर्यंतच्या जंकासच्या व्यवहाराकडे नजर टाकल्यास पारदर्शकता असल्याचे दिसून येते. हिच पारदर्शकता समोरही ठेवावी असे आवाहन केले.
प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण मडावी, अहवाल वाचन सचिव रवींद्र भुरसे, संचालन संस्थेचे सभासद प्रा. प्रदीप बोडणे यांनी केले. तर आभार डी. डी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुखदेव शेंद्रे, गवळीदास पंडेलगोत, जयद्रत बावनकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Keep transparency in governance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.