रेशन वाटपात पारदर्शकता ठेवा
By Admin | Published: June 23, 2017 12:55 AM2017-06-23T00:55:30+5:302017-06-23T00:55:30+5:30
गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना करावयाच्या धान वाटपात स्वस्त धान्य दुकानदारांनी पारदर्शकता ठेवावी,
देवराव होळी यांचे निर्देश : स्वस्त धान्य दुकानदारांची कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना करावयाच्या धान वाटपात स्वस्त धान्य दुकानदारांनी पारदर्शकता ठेवावी, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले.
तहसील कार्यालयाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील १९८ स्वस्त धान्य दुकानदारांना पीओएस मशीनच्या माहितीबाबत कार्यशाळा बुधवारी बाजार चौकातील सांस्कृतिक भवनात पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर. चांदुरकर, तहसीलदार अरूण येरचे, पुरवठा निरीक्षक रोशन कापसे, धान्य खरेदी निरीक्षक सुखदेव कावळे, विलास निरगुळे, अभियंता मंचलवार, तांत्रिक कर्मचारी अविनाश पिपरे आदी उपस्थित होते.
सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी पीओएस मशीनचा वापर करताना दर महिन्याच्या ३० तारखेस वाटप केलेल्या धान्याचा ट्रान्झेक्शन अपलोड करणे आवश्यक असून १ ते ५ तारखेपर्यंत पीओएस मशीनमध्ये डाटाबेस अपलोड करावा, असे पुरवठा अधिकारी चांदुरकर यांनी सांगितले.