खरीप पिकाची लागवड होणार

By admin | Published: May 25, 2014 11:34 PM2014-05-25T23:34:20+5:302014-05-25T23:34:20+5:30

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामाची तयारी केली असून जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड होणार आहे.

Kharif crop will be cultivated | खरीप पिकाची लागवड होणार

खरीप पिकाची लागवड होणार

Next

गडचिरोली : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने यावर्षी खरीप हंगामाची तयारी केली असून जिल्ह्यात १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रात खरीप पिकाची लागवड होणार आहे. कृषी विभागाने यावर्षी १ लाख ९१ हजार हेक्टर क्षेत्रात पीक लागवडीचे उद्दीष्ट ठेवले आहे.

यात भात पिकाची १ लाख ६८ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामात लागवड होणार असून यासाठी कृषी विभागाने २५ हजार ७४0 क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. सोयाबिन पिकाचे उद्दीष्ट ३ हजार ७४0 हेक्टर क्षेत्र असून यासाठी कृषी विभागाने १ हजार १५७ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. ६ हजार हेक्टर क्षेत्रात तूर पिकाची लागवड होणार असून १४६ क्विंटलची मागणी आहे. ७ हजार ९५0 हेक्टर क्षेत्रात कापूस पिकाचे लागवड होणार असून ६७ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी विभागाने केली आहे. २ हजार ५२५ हेक्टर क्षेत्रात मका पिकाची लागवडी होणार असून याकरिीा कृषी विभागाने ३२२ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. शेतकर्‍यांना यावर्षी खताची कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. २९ हजार ९00 मेट्रीक टन खताचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली आहे. जिल्ह्यातील चामोर्शी, मुलचेरा, अहेरी व सिरोंचा तालुक्यात कापसाचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यामुळे यावरचे ७ हजार ९५0 हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाच्या लागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. शेतकरी सध्या शेतीच्या पूर्व मशागतीच्या कामात गुंतलेला आहे. शेत स्वच्छ करण्याचे काम जोमात सुरू आहे.

Web Title: Kharif crop will be cultivated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.