सहा महिन्यानंतर शिजणार ‘खिचडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 10:25 PM2017-12-23T22:25:16+5:302017-12-23T22:25:35+5:30

यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीसह इतर आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले.

'Khichdi' to be cooked after six months | सहा महिन्यानंतर शिजणार ‘खिचडी’

सहा महिन्यानंतर शिजणार ‘खिचडी’

Next
ठळक मुद्देअखेर कंत्राट निश्चित : विद्यार्थ्यांना मिळणार पूरक पोषण आहार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : यावर्षी शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीसह इतर आहार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने लोटल्यानंतर पोषण आहार पुरविण्याचा कंत्राट करण्यात शालेय शिक्षण विभागाला यश आले. त्यामुळे उशिरा का होईना, अखेर शाळांमध्ये आता खिचडी शिजणार आहे.
शिक्षण संचालनालयाने प्रत्येक जिल्ह्यासाठी दिलेल्या कंत्राटात गडचिरोली जिल्ह्यासाठी दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह कंझुमर्स फेडरेशन लि.मुंबई यांच्याशी ८ डिसेंबर रोजी करारनामा झाला आहे. त्यानुसार डिसेंबर २०१७ पासून शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाचे साहित्य पुरविले जाणार आहे. आतापर्यंत केवळ तांदळाचा पुरवठा शाळांना केला जात होता. इतर पोषण आहाराचे साहित्य मुख्याध्यापकांनी आपल्या स्तरावर खरेदी करून पोषण आहार बनविण्यास सांगितले होते. पण काही दिवस मुख्याध्यापकांनी उधारीत किराणा साहित्य घेतल्यानंतर साहित्य देण्यास कोणी तयार नसल्यामुळे विद्यार्थ्यांची खिचडी शिजतच नव्हती. मुख्याध्यापकांनी उधारीत विकत घेतलेल्या साहित्यासाठी आता रक्कम मिळाली असून ती रक्कम पंचायत समित्यांच्या खात्यात वळती करण्यात आली आहे. आहारात दर शनिवारला अंडी, केळी, राजगिरा लाडू, बिस्कीट, गुळ-चणा, शेंगदाने यापैकी कोणताही एक पुरक आहार देणे गरजेचे आहे. मात्र त्याचा खर्च इंधन भाजीपाला खर्चातून करावयाचा आहे. त्यासाठी वेगळी तरतूद नसल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळविले.
तूर डाळीऐवजी मसूर डाळ
जिल्हा परिषद प्रशासनाने सोमवार ते शनिवार या सहा दिवसांच्या पोषण आहारात दररोज काय राहणार हे ठरवून दिले आहे. मात्र त्यात तूर डाळ गायब केली असून त्याऐवजी मसूर डाळ दिली जाणार आहे. शासन निर्णयानुसार तूर डाळीचा पुरवठा महाराष्टÑ राज्य पणन महासंघाकडून करण्यात येणार आहे. परंतू पणन महासंघाने गडचिरोली मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या पत्राची अद्याप दखलच घेतली नाही. त्यामुळे आहारात खंड पडू नये म्हणून तूर ऐवजी मसूर डाळ वापरण्याचा निर्णय जि.प. प्रशासनाने १८ डिसेंबरला घेतला.
असा असेल सहा दिवसांचा नियमित आहार
सोमवारी मूग डाळ व तांदळाची खिचडी किंवा मूग डाळीचे वरण व तांदळाचा भात, मंगळवारी भात व वाटाण्याची भाजी किंवा तांदूळ भात व वाटाणा उसळ, बुधवारी मूसर डाळीचे वरण व भात किंवा मसूर डाळ व तांदळाची खिचडी, गुरूवारी मूग डाळ व तांदळाची खिचडी किंवा मूग डाळ वरण भात, शुक्रवारी मसूर डाळ व खिचडी किंवा मसूर डाळ व वरण भात तर शनिवारी वाटाणा मसाले भात किंवा वाटाण्याचा पुलाव कोबी, बटाटा, गाजर पुलाव असा आहाराचा तक्ता बनविण्यात आला आहे.

Web Title: 'Khichdi' to be cooked after six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.