खोब्रामेंढा तीर्थक्षेत्र दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:16 PM2018-01-29T22:16:51+5:302018-01-29T22:17:19+5:30

Khobramendha pilgrimage neglected | खोब्रामेंढा तीर्थक्षेत्र दुर्लक्षित

खोब्रामेंढा तीर्थक्षेत्र दुर्लक्षित

googlenewsNext
ठळक मुद्देसोयीसुविधांचा अभाव : महाशिवरात्रीनिमित्त भरते जत्रा

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या खोब्रामेंढा तीर्थक्षेत्राचा विकास केल्यास या ठिकाणी भाविकांची संख्या वाढण्याबरोबरच पर्यटकांचीही संख्या वाढण्यास मदत होईल. मात्र हे ठिकाण दुर्लक्षित राहिले असल्याचे दिसून येते.
मालेवाडापासून २० किमी अंतरावर खोब्रामेंढा हे तीर्थक्षेत्र आहे. डोंगराच्या अगदी पायथ्याशी हनुमानाचे मंदिर आहे. तिन्ही बाजुने डोंगर असल्याने येथील निसर्ग सौंदर्य अधिकच फुलून दिसते. त्याचबरोबर खोब्रामेंढा मंदिराजवळील डोंगरावर ट्रेकींगसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविल्यास या ठिकाणी पर्यटक व साहसी युवकांची संख्या वाढू शकते. मात्र या ठिकाणी वीज व्यवस्था वगळता इतर कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. बदबदा ते खोब्रामेंढा या गावाच्या दरम्यान अर्धा किमी अंतरावर खोब्रामेंढा देवस्थान आहे. अर्धा किमी अंतर केवळ पाऊलवाट आहे. पावसाळ्यात या ठिकाणी जाणे कठीण होते.
खोब्रामेंढा येथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते. मात्र या ठिकाणी वीज व एक विहीर वगळता इतर सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर तालुक्यातील काही मोजक्याच नागरिकांना माहित आहे. चार वर्षांपूर्वी या परिसरात नक्षल्यांची दहशत होती. त्यामुळे युवक मंदिराजवळच्या डोंगरावर चढत नव्हते. मात्र चार वर्षांपूर्वी जवळपास सात नक्षलवादी मंदिराजवळच मारल्या गेले. तेव्हापासून या ठिकाणची नक्षल्यांची दहशत कमी झाली आहे. आता अनेक युवक डोंगरावर चढून ट्रेकींगचा अनुभव घेत असल्याचे दिसून येते.

Web Title: Khobramendha pilgrimage neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.