चिमुकल्यांनी केली बसस्थानकाची साफसफाई; गडचिरोली जिल्ह्यातील गावकऱ्यांचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 02:28 PM2019-05-03T14:28:39+5:302019-05-03T14:29:41+5:30

 मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र गोमनी ग्रामपंचायतीचे बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत होते.

kids cleaned bus station location; in Gadchiroli District | चिमुकल्यांनी केली बसस्थानकाची साफसफाई; गडचिरोली जिल्ह्यातील गावकऱ्यांचा उपक्रम

चिमुकल्यांनी केली बसस्थानकाची साफसफाई; गडचिरोली जिल्ह्यातील गावकऱ्यांचा उपक्रम

Next
ठळक मुद्देग्रामपंचायतीच्या डोळ्यात घातले अंजन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मूलचेरा तालुक्यातील गोमनी येथील बसस्थानकाची काही दिवसांपूर्वी रंगरंगोटी करण्यात आली होती. मात्र गोमनी ग्रामपंचायतीचे बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत होते. सध्या उन्हाचा तडाखा खूप वाढला असून प्रवासी घाणीपायी बसस्थानकात बसत नव्हते. बसस्थानकालगतच्या पानटपरीवर बसून बसची प्रतिक्षा करीत असत.
ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एक नवीच गांधीगिरी अमलात आणली. गावातील चिमुकल्यांना हाताशी धरले आणि शुक्रवारी सकाळपासून ही बालसेना बसस्थानकाच्या स्वच्छतामोहिमेवर लागली. पाहता पाहता त्यांनी स्थानकाची व परिसराची साफसफाई करून त्याला चक्क केले. या लहान मुलांना गावकºयांकडून शाबासकी तर मिळते आहेच पण त्यांनाही आपण भलेमोठे बस स्थानक स्वच्छ केले याचाही आनंद मिळतो आहे. याचसोबत गोमनी ग्रामपंचायतीच्या डोळ्यात या निमित्ताने अंजन पडले आहे.
 

Web Title: kids cleaned bus station location; in Gadchiroli District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.