ट्रक-टिप्परच्या धडकेत एक ठार

By admin | Published: May 22, 2014 01:04 AM2014-05-22T01:04:20+5:302014-05-22T01:04:20+5:30

भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रक व टिप्परची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण जखमी

A killer in a truck-trickle | ट्रक-टिप्परच्या धडकेत एक ठार

ट्रक-टिप्परच्या धडकेत एक ठार

Next

चुरमुरा : भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रक व टिप्परची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना आरमोरी-गडचिरोली मार्गावरील चुरमुरा गावानजीक मंगळवारीे रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली.

या अपघातात ठार झालेल्या टिप्पर चालकाचे नाव हिवराज रामदास नेवारे (३१) रा. पुतळी ता. देवरी जि. गोंदिया असे आहे. जखमींमध्ये ट्रकचालक अशोककुमार रवींद्रनाथ मिo्रा (४0) व वाहक o्रावणकुमार मिo्रा (३0) दोघेही रा. फुटवारा ता. कवरीया जि. दरभंगा (बिहार) यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार टिप्पर चालक हिवराज नेवारे हा काल रात्रोच्या सुमारास डांबर प्लॅन्टवरून एमएच-४0-३१८0 क्रमांकाचा टिप्पर घेऊन गडचिरोलीकडे जात होता. दरम्यान चंद्रपूरवरून गडचिरोली-आरमोरी मार्गे मॅग्नीज भरलेला एमएच-४0 वाय-७६५७ क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने जात होता. दरम्यान चुरमुरा गावानजीक या दोन्ही वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली. यात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला पलटली.

टिप्पर चालक हिवराज नेवारे हा टिप्परमध्ये दबून गंभीर जखमी झाला. चुरमुरा येथील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमी टिप्पर चालकास बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलीस घटनास्थळावर पोहोचली. गंभीर जखमी झालेला टिप्परचालक हिवराज नेवारे व ट्रकच्या चालकास व वाहकास आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान टिप्पर चालक हिवराज नेवारे याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर काही वेळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी ट्रकचालक अशोककुमार मिo्रा याचेवर भादंवि कलम २१९, ३३८, ३0४ (अ), ४२७ व मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिका तपास पोलीस निरीक्षक महेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार धनिराम राऊत व आनंद कांबळे करीत आहेत. घटनास्थळावर नागरिकांची गर्दी जमली होती. (वार्ताहर)

Web Title: A killer in a truck-trickle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.