शाैचालय, मूत्रीघर सभाेवताल घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:33 AM2021-01-18T04:33:29+5:302021-01-18T04:33:29+5:30
जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे बसस्टॅन्डजवळ सार्वजनिक मूत्रीघर आहे. मात्र हे शाैचालय घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परिणामी दुर्गंधीमुळे ...
जिमलगट्टा : अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे बसस्टॅन्डजवळ सार्वजनिक मूत्रीघर आहे. मात्र हे शाैचालय घाणीच्या विळख्यात सापडले आहे. परिणामी दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वर्षभर शाैचालय व मूत्रीघराजवळ कचरा पडून असताे. प्रवाशांना घाणीतून मार्ग काढत मूत्रीघरात लघुशंकेसाठी जावे लागते. ग्रामपंचायत प्रशासनाकडून येथे स्वच्छता करण्यात आली नाही. वर्षभरापूर्वी या ठिकाणी शाैचालयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र एकही दिवस या शाैचालयाचा वापर झाला नाही. त्यामुळे हे शाैचालय निकामी ठरले आहे. या ठिकाणी पाण्याची साेय नाही. दाेन महिन्यातच शाैचालयाचे बांधकाम काेसळून पडले आहे, शिवाय येथे दरवाजाचा अभाव आहे. या सार्वजनिक शाैचालय व मूत्रीघराची दुरुस्ती करून स्वच्छता करण्यात यावी. शाैचालय बांधकामाची चाैकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू सलामे यांनी केली आहे.