किन्हाळा/मोहटोलाची पाणी पुरवठा याेजना १९ वर्षांपासून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:42+5:302021-03-05T04:36:42+5:30
देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा/ मोहटोल्याची नळयोजना तब्बल १९ वर्षापासून बंद असुन येथील नागरीक बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवित ...
देसाईगंज : तालुक्यातील किन्हाळा/ मोहटोल्याची नळयोजना तब्बल १९ वर्षापासून बंद असुन येथील नागरीक बोअरवेलच्या पाण्यावर तहान भागवित आहेत. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागुन नवीन कार्यकारीणी सत्येत आलेली आहे. पाण्याचा यक्ष प्रश्न आत्तातरी सुटणार का? असा प्रश्न जनतेपुढे आहे.
तालुका मुख्यालयापासुन ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या किन्हाळा/मोहटोला येथे सन १९९२ ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने किन्हाळा/ मोहटोला गावासाठी ५० हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली. ही नळ योजना सुरळीत सुरु ठेवण्यासाठी लगतच्या गाढवी नदीवर बांधलेल्या पाणी साठवणुक विहिरीच्या माध्यमातून मोटारपंपच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत होता. सदर नळयोजना १० वर्षे बरोबर चालली . दरम्यान पाईपलाईन फुटणे,वारंवार मोटारपंप बिघडणे यामुळे पाणी पुरवठा खंडित होण्याची मालिका सुरू झाली होती.
स्थानिक गावकऱ्यांची समस्या लक्षात घेता नळयोजनेच्या दुरस्तीचे काम हाती घेतलेला होता. पण ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत होऊ शकली नाही.
गावाची लोकसंख्या आजमितीस दाेन हजारच्या आसपास असुन नळयोजना बंद पडली असल्यापासून गावात बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याची तहान भागवल्या जात आहे. बोअरवेलच्या पाण्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने येथील नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. लगतच गाढवी नदी असल्याने बारमाही पाण्याची सोय उपलब्ध असताना तब्बल १९ वर्षापासून नळयोजना बंद असल्याने दरम्यान नळयोजनेला अखेरची घरघर मोजत आहे. बरेच वर्षानंतर सत्तेत परिवर्तन झाल्याने नवीन सरंपच व कार्यकारणी हा पाण्यासारखा ज्वलंत प्रश्न हाताळून किन्हाळा मोहटोला येथील पाणीपुरवठा योजना १९ वर्षानंतर सुरु होणार की नाही. नवीन सत्येत आलेल्या पदाधिकारी यांनी हा पाणीप्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी अपेक्षा येथील नागरीकांनी व्यक्त केलेली आहे.