काेराेनानंतर बदलले घराघरातले स्वयंपाकगृह; हेल्दी पदार्थ वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:48 AM2021-06-16T04:48:06+5:302021-06-16T04:48:06+5:30

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे बहुतांश कुटुंबीयांनी आपल्या आहार-विहारात बराच बदल केला. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व ए व सी ...

The kitchen in the house changed after Kareena; Healthy foods increased | काेराेनानंतर बदलले घराघरातले स्वयंपाकगृह; हेल्दी पदार्थ वाढले

काेराेनानंतर बदलले घराघरातले स्वयंपाकगृह; हेल्दी पदार्थ वाढले

Next

गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे बहुतांश कुटुंबीयांनी आपल्या आहार-विहारात बराच बदल केला. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व ए व सी चा समावेश असलेले पदार्थ सेवन करण्याकडे नागरिकांचा कल वाढला. शिवाय प्रथिनेयुक्त पदार्थ बनविण्याचे प्रमाणही वाढले आहे. काेराेनाकाळात तसेच काेराेनानंतर स्वयंपाकगृह व त्यात तयार हाेणारे पदार्थ बदलल्याचे दिसून येते.

काेराेना महामारीच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढली, तसेच बळींची संख्या बरीच हाेती. त्यामुळे बहुतांश महिला व पुरुषांनी जीवनसत्वांचा समावेश असलेल्या फळांचा व स्वयंपाकगृहात तयार हाेणाऱ्या पदार्थ सेवनावर भर दिला. आता काेराेनाची दुसरी लाट संपुष्टात आली असली तरी बरेच कुटुंब राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हेल्दी पदार्थांचे सेवन अजूनही करीत आहेत.

काेराेना संसर्गाचा अधिकाधिक धाेका ४५ वर्षांवरील महिला व पुरुषांना असल्याचे तज्ज्ञांनी सांगितल्यानंतर या वयाेगटातील नागरिकांनी आपल्या आहार-विहाराकडे बारकाईने लक्ष देणे सुरू केले. याशिवाय गर्भवती व स्तनदा मातांनीसुद्धा काेराेनाकाळापासून आहाराकडे विशेष लक्ष दिले आहे.

बाॅक्स...

कच्च्या भाज्या, कडधान्याचा वापर वाढला

- माणसाच्या शरीरातील राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जीवनसत्व ए, सी, डी आदींची नितांत गरज असते. हे सर्व जीवनसत्व ओल्या व कच्चा भाजीपाला, गाजर, पालक, संत्री, पपई, दूध, अंडी, मांसाहार आदी पदार्थांतून मिळते. त्यामुळे हे पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढले आहे.

-माेड आलेल्या कडधान्यापासून जीवनसत्व मिळतात. यामध्ये मटकी, चना, तूर, मूग आदींसह इतर कडधान्यांचा समावेश आहे. दरराेजच्या जेवणात वरण व विविध डाळींचा वापर आता वाढला आहे. विविध कडधान्यांची उसळ बनवून ते सेवन करण्यावर अनेक कुटुंब भर देत आहेत.

-गडचिराेलीच्या जंगलात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या यामध्ये कडूभाजी, कुड्याचे फुल, राजगिरे भाजी, पिंपळाचा बार आदींचाही वापर स्वयंपाकगृहात वाढला आहे. अनेक महिला गृहिणी प्रथिनेयुक्त पदार्थ बनविण्यावर भर देत आहेत.

बाॅक्स...

फास्ट फूडला ब्रेक

तळलेले पदार्थ, तसेच फास्ट फूडला अनेक नागरिकांनी ब्रेक दिला आहे. काेराेना संसर्गाची समस्या निर्माण झाल्यापासून बऱ्याच नागरिकांनी उघड्यावरील, तसेच हात ठेल्यावरील पदार्थ खाणे पूर्णत: बंद केले आहे. घरच्या स्वयंपाकगृहात बनलेले ताजे जेवण, तसेच विविध पदार्थ खाण्यावर मुले, मुली, वयाेवृद्ध पुरुष, नागरिक भर देत आहेत. काेराेना संकटाच्यापूर्वी फारशी भीती नसल्याने चायनीजच्या ठेल्यावर युवक, युवती, तसेच विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी राहत हाेती. मात्र, काेराेनापासून ही गर्दी ओसरली आहे. पूर्वीच्या तुलनेत आता फास्ट फूडचा व्यवसायही मंदावला आहे.

बाॅक्स...

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी राेजच्या जेवणात हे हवेच

- शरीराला विविध प्रकारच्या जीवनसत्वाचा पुरवठा हाेण्यासाठी पुरेसा व सकस आहार देणे गरजेचे आहे. राेजच्या जेवणात भाजीपाला, हिरव्या पालेभाज्यांचा वापर आवश्यक आहे.

- विविध प्रकारचे कडधान्य व प्रथिनेयुक्त पदार्थाचे सेवन करणे गरजेचे आहे. पालक, मेथी, मुळा आदींसह विविध प्रकारच्या रानभाज्यांचे सेवन भाेजनात फायदेशीर ठरते.

काेट...

आमच्या घरी राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मासे, अंडी बनविण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय गडचिराेली जिल्ह्याच्या जंगलात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या स्वयंपाकात वापरल्या जात आहेत. याशिवाय सलाद व ड्रायफूडचे सेवन केले जात आहे.

- प्रा. विद्या सागर, म्हशाखेत्री

.....................

राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, तसेच काेराेनातून बरे हाेण्यासाठी सुका मेव्याचे लाडू बनवून सर्वांना खाऊ घातले. याशिवाय विविध फळांचा ज्यूस, हिरव्या भाज्या, माेड आलेल्या कडधान्याचा वापर भाेजनामध्ये सतत करीत आहाेत. याशिवाय अंडी, मासे आदींचा वापर वाढविला आहे. आहारात काळजी बाळगत आहे.

- मंगला किरण कारेकर

..................

काेराेना काळापासून स्वयंपाकातील पदार्थावर बारकाईने लक्ष दिले जात आहे. राेगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीर निराेगी राहावे यासाठी जीवनसत्व असलेल्या भाज्यांचा वापर भाेजनात केला जात आहे. याशिवाय विविध फळांचे सेवन केले जात असून दरराेजच्या जेवणात सलाद घेतले जात आहे.

- रजनी श्रीकृष्ण अर्जुनकर

Web Title: The kitchen in the house changed after Kareena; Healthy foods increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.