मृदा सर्वेक्षण, परीक्षण केंद्राची माहिती जाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:25 AM2021-07-10T04:25:30+5:302021-07-10T04:25:30+5:30

आरमाेरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी अंतर्गत रसायनशास्त्र विभागातर्फे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा ...

Knowledge of soil survey, testing center | मृदा सर्वेक्षण, परीक्षण केंद्राची माहिती जाणली

मृदा सर्वेक्षण, परीक्षण केंद्राची माहिती जाणली

googlenewsNext

आरमाेरी : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी अंतर्गत रसायनशास्त्र विभागातर्फे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे जैवविविधता नोंदवही कार्य करण्यासाठी रसायनशास्त्र विभागातील पी. बी. आर. विद्यार्थी गटाच्या वतीने मृदा सर्वेक्षण व परीक्षण केंद्र, गडचिरोली येथे नुकतीच भेट देण्यात आली. याप्रसंगी संकलित केलेले मातीचे नमुने तपासणी व त्याचे महत्त्व जाणून घेण्यात आले.

लोकांचे जैवविविधता नोंदवही तयार करणारे विद्यार्थी व रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के, डॉ. नरेश बन्सोड, डॉ. सतीश कोला यांनी मृदा सर्वेक्षण व परीक्षण केंद्र गडचिरोली येथे भेट दिली. मातीचे घटक फास्पोरस, नायट्रोजन, पोटॅशियम, आर्गानिक कार्बन, सूक्ष्म मूलद्रव्य इत्यादींची तपासणी व विविध उपकरणे हाताळण्याचे प्रशिक्षण घेण्यात ली व मृदा सर्वेक्षणाचे स्वरूप आणि प्रक्रिया समजून घेण्यात आली.

यावेळी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी प्रयोगशाळाचे सुनील बुद्धे, कृषी पर्यवेक्षक प्रिया आखाडे, के. वझाडे, स्वाती दौरेवार, प्रेमज्योती मेश्राम कृषी सहायक, महाविद्यालयाचे पीबीआरचे विद्यार्थी तेजस जक्कुलवार, ऐश्वर्या मुचलवार, जयश्री करंगामी उपस्थित होते.

Web Title: Knowledge of soil survey, testing center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.