Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत जिल्ह्यातील कोयनगुडा गावाने घेतला गावबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 06:49 PM2020-03-27T18:49:16+5:302020-03-27T18:49:37+5:30

भामरागड तालुक्यातील बांबू हस्तकला व धातू शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोयनगुडा गावाने बाहेरील लोकांसाठी गावबंदी केली आहे.

Koenguda village in Gadchiroli district decides the blockade | Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत जिल्ह्यातील कोयनगुडा गावाने घेतला गावबंदीचा निर्णय

Corona Virus in Gadchiroli; गडचिरोलीत जिल्ह्यातील कोयनगुडा गावाने घेतला गावबंदीचा निर्णय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना व निर्देश दिले जात आहेत. प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत भामरागड तालुक्यातील बांबू हस्तकला व धातू शिल्पकलेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कोयनगुडा गावाने बाहेरील लोकांसाठी गावबंदी केली आहे.
कोरोना विषाणूने संपूर्ण मानवजातीला संकटात टाकले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी नागरी भागांसोबत ग्रामीण भागातही अनेक उपाय योजले जात आहेत.भामरागड तालुक्यातील अनेक गावांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. उपक्रमशील कोयनगुडा गावांनी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत गावबंदीचा निर्णय घेतला असून तशा आशयाचा फलक गावातल्या वेशीवर लावण्यात आलेला आहे. यावेळी मनोहर हबका,मंगिया हबका,सागर गावडे,अतुल हबका,नागु नरोटी नामु हबका, चैतू मुडमा, मोतीराम गावडे, बाजू वाचामी, अरुण मडावी इत्यादी कोयनगुडा ग्रामस्थ पंचाचे निर्णयानुसार गावबंदीचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Koenguda village in Gadchiroli district decides the blockade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.