मोसम येथे कोयापुनेम संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:01 AM2019-01-04T00:01:11+5:302019-01-04T00:03:01+5:30
मोसम येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व कोयापुनेम संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार दीपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : मोसम येथे सल्ला गांगरा शक्तीचे अनावरण व कोयापुनेम संमेलन घेण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन माजी आमदार दीपक आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य सुनिता कुसनाके, अनिता आत्राम, अजय नैताम, अहेरी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, पं.स. सदस्य भास्कर तलांडे, गीता चालुरकर, देवलमरीच्या सरपंच पेंटूबाई पोरतेट, खांदलाचे सरपंच शकुंतला कुळमेथे, तिमरमचे सरपंच महेश मडावी, नागेपल्लीचे सरपंच सरोज दुर्गे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर आत्राम, वंदना अलोणे, माजी सरपंच ज्योती जुमनाके, बुच्चा सडमेक, माधव कुळमेथे, अनिता सेडमाके, दुर्गा आलाम, परचाके, मोसमचे उपसरपंच जगन्नाथ मडावी, सिनू राऊत, महेश पोरतेट, लालू आलाम, श्रीहरी सडमेक, दौलत मडावी, सुखदेव नैताम, ममिता आलाम, इंदिरा मडावी, सुशिला सडमेक आदी मान्यवर उपस्थित होते. सल्ला गांगराचे गोंगापुजक म्हणून तुकाराम सडमेक, आनंदराव सडमेक हजर होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार दीपक आत्राम यांनी आदिवासी समुदायाचे झपाट्याने विलिनीकरण होत असल्याने आदिवासी संस्कृती, बोली भाषा लोप पावण्याच्या मार्गावर आहे. या संस्कृतीचे जतन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले. जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मार्गदर्शन करताना अनंत काळापासून आदिवासी हा निसर्गपूजक राहिला आहे. आदिवासींची एक वेगळी ओळख आहे. काही राजकारणी स्वत:ची पोळी भाजपण्यासाठी समाजाचा वापर करीत आहेत. मोसम परिसरातील समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, जिल्हा परिषदेमार्फत निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केले. गोंडी नृत्याने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
या महोत्सवाला मोसम गावासह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. पारंपारिक वाद्यांच्या माध्यमातून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.