लग्न तिथीचा पालनकर्ता कोहळी समाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:17 AM2018-04-30T01:17:17+5:302018-04-30T01:17:17+5:30

अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

Koli society of the wedding date | लग्न तिथीचा पालनकर्ता कोहळी समाज

लग्न तिथीचा पालनकर्ता कोहळी समाज

Next
ठळक मुद्देपंचांग औपचारिकता : वऱ्हाड्यांच्या नाचगाण्यांमुळे लग्न तिथीची ऐसीतैसी

प्रदीप बोडणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : अलिकडे लग्नाची तिथी केवळ औपचारिकता राहिली आहे. त्यामुळे वऱ्हाड्यांच्या उत्साहात कोणालाही वेळेचे भान नसते. मात्र कोहळी समाजाने आजही लग्नतिथीनुसार ठरलेल्या वेळेवरच लग्न लावून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
सनई चौघडाचे मंगल सूर कानी पडताच लग्नाचा मुहूर्त जवळ आला म्हणून वधू मंडळीची एकच धावपळ सुरू होते आणि जानोश्यावर नवरदेव निघाल्याचे वृत्त धडकताच नवदेवाला ओवाळण्यासाठी आणि वराकडील मंडळीच्या स्वागतासाठी पंचआरती घेऊन सुहासिनी सज्ज असतात. परंतु वधू मंडळीला वर पोहोचायला दोन तास वेळ आहे, अशी माहिती मिळते आणि साऱ्यांचा हिरमोड होतो.
लग्नपत्रिका, पंचांग मुहूर्त हे सगळे सोपस्कार भावी वधू-वराच्या मांगल्यासाठी असतील तर वराकडील मंडळीच्या नाचगाण्यामुळे लग्न तिथी टाळणे योग्य नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लग्न तिथीचे तंतोतंत पालन करणारा म्हणून कोहळी समाजाचा प्रामुख्याने उल्लेख होतो. वरातीतील नाचगाणे कितीही करा, पण मुहूर्त टळू देणार नाही आणि यासाठी कुठलीही सबब सांगू दिल्या जात नाही. वराकडील मंडळीकडून तसा प्रयत्न होत नाही. त्यामुळे भोजनावळी आटोपून पाहुणे लग्न मंडळी वेळेवर ईच्छित स्थळी पोहोचणे सोयीचे होते. इतर ठिकाणी लग्नाचा मुहूर्त सकाळी ११ वाजता आणि विवाह लागतो दुपारी. नाचणाऱ्यांच्या धिंगाण्यामुळे दोन्हीकडील पाहुणे मंडळींची गैरसोय होते.
इतर समाजापुढे ठेवला आदर्श
कोहळी समाजासह काही विशिष्ट समाज आजही लग्न तिथीप्रमाणे वेळेवर लग्नकार्य करीत आहेत. मात्र बहुतांश समाजातील लग्नकार्याची वेळ निश्चित नसते. सद्या जिल्हाभरात लग्नाचा हंगाम जोमात सुरू आहे. त्यातच उष्णतेचा पारा ३३ अंशावर पोहोचला आहे. अशा तप्त उन्हात लग्नकार्यात सहभागी होणे पाहुण्यांसाठी त्रासाचे ठरते. त्यामुळे कोहळी समाजाचा इतर समाजाने आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Koli society of the wedding date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न