गडचिरोलीतील सर्पदंशानंतर एका विशिष्ट झाडाखाली झोपल्याने विष उतरत असल्याची श्रद्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 12:59 PM2020-11-17T12:59:08+5:302020-11-17T13:51:26+5:30

Gadchiroli News सिरोंचा तालुक्यातील मुख्यालयापासून 48 कि. मी अंतरावर असलेले अतिदुर्गम आदिवासी गाव कोपेल्ला या गावात साप चावल्यावर एका विशिष्ट झाडाखाली झोपल्यास कोणीही मृत्युमुखी पडत नाही अशी येथील लोकांमध्ये श्रद्धा आहे.

Kopella in Gadchiroli is believed to have been unpoisoned by sleeping under a certain tree after being bitten by a snake | गडचिरोलीतील सर्पदंशानंतर एका विशिष्ट झाडाखाली झोपल्याने विष उतरत असल्याची श्रद्धा

गडचिरोलीतील सर्पदंशानंतर एका विशिष्ट झाडाखाली झोपल्याने विष उतरत असल्याची श्रद्धा

Next
ठळक मुद्देसर्पदंशाने आजवर एकही मृत्यू नाहीतेलंगणाहून येतात सर्पदंशाचे रुग्ण

कौसर खान
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: सिरोंचा तालुक्यातील मुख्यालयापासून 48 कि. मी अंतरावर असलेले अतिदुर्गम आदिवासी गाव कोपेल्ला या गावात साप चावल्यावर एका विशिष्ट झाडाखाली झोपल्यास कोणीही मृत्युमुखी पडत नाही अशी येथील लोकांमध्ये श्रद्धा आहे.
सुमारे 500 लोकसंख्या असलेल्या कोपला या गावात 40 वर्षांपूर्वी वन विकास महामंडल परिक्षेत्र कार्यालय होते. या वन मंडळाच्या वतीने वृक्ष लागवड कार्य करायचे आणि या कार्यात अंदाजे तीन हजार मजूर काम करायचे. या गावात एक भव्य असा अतिथीगृह होते मात्र काही दिवसांनी वन विभागाचे मंडळ गुंडाळले आणि त्या अतिथीगृहाला नक्षलवाद्यांनी ध्वस्त केले. परंतु या अतिथीगृहाच्या प्रांगणात एक विशेष वृक्ष आहे. या वृक्षचे महत्व म्हणजे गावात कोणालाही साप चावले तर तो व्यक्ती या झाडाखाली बसतो आणि त्याचा शरीरातील विष आपोआप कमी होते. ही वृक्षाबद्दल प्रसिद्धी झाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी येथे अनेक आयुर्वेदिक, वैज्ञानिक आले पण कोणालाही या रहस्यमयी झाडामागील चमत्कारी बाब समजून आलेले नाही. त्यामुळे जवळपासच्या गावांमधून व तेलंगणातूनही साप चावलेल्या व्यक्ती येथे येऊन झाडाखाली झोपतात.  विशेष ठिकाणी खूप वनौषधींची वृक्ष आहेत त्या औषधी गुण असलेले झाडाच्या सुहासाने बहुतेक विष शरीरात चढत नसावे असा अंदाज व्यक्त केला जातो. याठिकाणी येऊन काही संशोधकांनी शोधही घेतला मात्र त्यांचे प्रयत्न विफल झाले.

आमच्या पूर्वजपासून आम्ही साप चावल्यानंतर त्या झाडाखाली बसतो आणि विष कमी होते.
मनोहर चेडे
माजी सरपंच,सामाजिक कार्यकर्ता.


वैद्यकीयदृष्ट्या अशा गोष्टींना मान्यता नाही. तेथील स्थनिक लोकांचा मान्यता असेल. परंतु साप चावल्याने दवाखान्यात उत्तम उपचार होतो.
डॉ एम पी कन्नाके
तालुका वैद्यकीय अधिकारी, सिरोंचा, जि. गडचिरोली

Web Title: Kopella in Gadchiroli is believed to have been unpoisoned by sleeping under a certain tree after being bitten by a snake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.