कोर्ला गाव मूलभूत सोयींपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:39 AM2021-02-09T04:39:11+5:302021-02-09T04:39:11+5:30

कर्जासाठी युवकांची पायपीट अहेरी : बेरोजगार युवक उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे ...

Korla village is deprived of basic amenities | कोर्ला गाव मूलभूत सोयींपासून वंचित

कोर्ला गाव मूलभूत सोयींपासून वंचित

Next

कर्जासाठी युवकांची पायपीट

अहेरी : बेरोजगार युवक उद्योग सुरू करण्याच्या उद्देशाने कर्ज घेण्यासाठी बँकेच्या चकरा मारत आहेत. मात्र, त्यांच्याकडे तारण नसल्याचे कारण पुढे करीत बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. बेरोजगारांना कर्ज मिळून उद्योग निर्मिती होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

अनेक रस्ते अरुंदच

वैरागड : रस्त्याच्या दुतर्फा अनेक शेतकऱ्यांनी रस्त्यावर कुंपन केल्याने रस्त्याच्या कडा दिसेनाशा झाल्या आहेत. विरुद्ध दिशेने येणारे वाहन ओलांडताना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेगडी येथील पशुवेद्यकीय दवाखान्याची इमारत बांधा

घोट : पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या रेगडी येथील पशुवैैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ ची इमारत व कर्मचारी खोली पूर्णता जीर्ण होऊन मोडकळीस आले आहे. रेगडी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत एकूण ३ गावे येतात. यामध्ये रेगडी, विकासपल्ली, माडेआमगाव आदींचा समावेश आहे. बहुसंख्य पशुधन असतानाही येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर इमारतीचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधावी, अशी मागणी परिसरातील पशुपालकांनी प्रशासनाकडे केली आहे.

चिरेपल्ली मार्गाची अवस्था बकाल

गुड्डीगुडम : अहेरी तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चिरेपल्ली मार्गाचे मातीकाम १० वर्षांपूर्वी करण्यात आले. या मार्गाचे खडीकरण न झाल्याने रस्ता पूर्णत: खड्डमेय झाला आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या येथून आवागमन करणे कठीण होत आहे.

लघु व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी

आरमोरी : अद्ययावत तंत्रज्ञानामुळे अनेक लघु व्यवसाय आता शेवटच्या घटका मोजत आहेत. मोबाईलमुळे घड्याळ दुरुस्तीचे काम शिल्लकच राहिले नसल्याने दुरुस्तीचे काम करणाऱ्या कारागिरांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे विक्रेतेही चिंतेत सापडले आहेत.

रोजगारासाठी भटकंती सुरू

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने येथील बरेचशे सुशिक्षित युवक पुणे, नागपूर व इतर शहरांत कंपन्यांमध्ये कामासाठी जात असतात. मात्र, राजस्थान व इतर राज्यांतील बहुतांश कुटुंबे दरवर्षी उन्हाळ्यात गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागांत येऊन मजुरी मिळवितात. परप्रांतीय अनेक कुटुंबे गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाली असून, एका गावावरून दुसऱ्या गावी या कुटुंबांची भटकंती रोजगारासाठी सुरू झाली आहे.

शेतीच्या कुंपनासाठी वृक्षतोड

आरमाेरी : शेतीच्या कुंपनासाठी झाडाच्या फांद्या तोडून त्याचे खांब तयार केले जातात. कुंपनासाठी शेतकरी दरवर्षी शेकडो वृक्षांची तोड करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर लोखंडी खांब उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

महागावजवळ पूल बांधा

महागाव बु. : अहेरी तालुका मुख्यालयापासून सहा किमी अंतरावरील महागावजवळ नाल्यावर ठेंगणा पूल आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावर पाणी चढून दोन ते तीन दिवस वाहतूक ठप्प होत असते. सातत्याने मागणी करूनही या नाल्यावर उंच पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही.

विना परवाना अर्जनविसांचा सुळसुळाट

गडचिरोली : जिल्ह्यात तालुक्यातील तहसील परिसरात अनेक परवानाधारक अर्जनवीस तहसीलचे विविध प्रकारचे फाॅर्म अशिक्षित नागरिकांना भरून देण्यासाठी बसतात. मात्र, काही विनापरवानाधारक अर्जनवीससुद्धा या कामात असल्याचे दिसून येते. विनापरवानाधारक अर्जनवीस अशिक्षित जनतेची आर्थिक फसवणूक करत असल्याने याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष घालून खड्डे बुजवावे, अशी मागणी आहे. मात्र, याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.

पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी

गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंदस्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

हालेवारा परिसरात थ्रीजी सेवा उपलब्ध करा

एटापल्ली : तालुक्यात मोठ्या संख्येने पोलीस, सीआरपीएफ, एसआरपीएफचे जवान आहेत. आपल्या कुटुंबापासून दूर राहून तालुक्यात सेवा देत आहेत. त्यांना कुटुंबासोबत संवाद साधण्याचे एकमेव साधन मोबाईल असून, अनेकवेळा नेटवर्कमध्ये अडचणी असल्याने त्यांना कुटुंबासोबत संवाद साधता येत नाही.

Web Title: Korla village is deprived of basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.