कुनघाडा रै. ते नवतळा मार्गावरील पुलाचे बांधकाम अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:36 AM2021-05-13T04:36:56+5:302021-05-13T04:36:56+5:30
कुनघाडा रै. ते नवतळा-जोगणामार्गे पाच किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता आहे. रस्त्यावर कुनघाडा रै. येथील श्रीराम वाॅर्डापासून ३०० मीटर अंतरावर ...
कुनघाडा रै. ते नवतळा-जोगणामार्गे पाच किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता आहे. रस्त्यावर कुनघाडा रै. येथील श्रीराम वाॅर्डापासून ३०० मीटर अंतरावर नाला वाहत असल्यामुळे अगदी खालभागावर मोरीचे बांधकाम करण्यात आले होते; मात्र पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून मोरीवरून पाणी वाहत असल्यामुळे रहदारी बंद पडत होती. त्यामुळे मागणीनुसार ३०-५४ निधीअंतर्गत ६० लाख रुपये मंजूर करून निविदा प्रक्रिया पार पाडून कंत्राटदारामार्फत जानेवारी महिन्यात बांधकामास सुरुवात झाली. पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे रहदारीस अडथळा येऊ नये म्हणून बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातून रपटा तयार करण्यात आला. सध्या येथून रहदारी सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम पूर्ण झाले नाही तर संबंधित शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातून जाणारा रपटा बंद केल्यास रहदारी बंद पडणार आहे. ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू आहे, त्या ठिकाणी पावसाचे पाणी व गावातून जाणारा पाण्याचा लोंढा साचून राहत असतो. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कुनघाडा रै. गाव परिसरातील खेड्यांची देवाणघेवाणीची बाजारपेठ असल्यामुळे पुलाच्या पलीकडील नवतळा, जोगणा, भाडभिडी, मुरमुरी, पाविमुंराडा, आदी गावांतील नागरिक याच रस्त्याने आवागमन करीत असतात. त्यामुळे पुलाचे बांधकाम तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. काही दिवसांतच पावसाळ्याला सुरुवात होईल. त्यामुळे संबंधित विभागाने पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत कंत्राटदारास निर्देश द्यावेत, अशी मागणी कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे यांनी केली आहे.
===Photopath===
110521\3020img-20210511-wa0233.jpg
===Caption===
कुनघाडा रै. ते नवतळा मार्गावर अर्धवट स्थितीत असलेले पुलाचे बांधकाम.