दारू विक्रेत्यांविरोधात कुरखेडा पोलिसांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 05:00 AM2020-06-10T05:00:00+5:302020-06-10T05:00:40+5:30
तालुक्यातील चिखली येथील निखिल राऊत व मंदाबाई राऊत यांच्या घरून देशी दारूच्या १०० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत पाच हजार रूपये होते. याच गावातील सूर्यकांत मडावी याच्या घरी धाड टाकून ६० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत तीन हजार रूपये एवढी होते. आंधळी येथील हरिदास नागोसे याच्या घरावर धाड टाकून १०० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी पाच विविध ठिकाणी तर मंगळवारी एका ठिकाणी धाड टाकून दारू आठ विक्रेत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून देशी व मोहफुलाचा सडवा जप्त करण्यात आला.
तालुक्यातील चिखली येथील निखिल राऊत व मंदाबाई राऊत यांच्या घरून देशी दारूच्या १०० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत पाच हजार रूपये होते. याच गावातील सूर्यकांत मडावी याच्या घरी धाड टाकून ६० सिलबंद निपा जप्त केल्या. त्याची किंमत तीन हजार रूपये एवढी होते. आंधळी येथील हरिदास नागोसे याच्या घरावर धाड टाकून १०० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. कुरखेडा येथील आंबेडकर चौकातील माधुरी जुमनाके हिच्या घरातून पाच लिटर दारू जप्त केली. आरमोरी तालुक्यातील चव्हेला येथील रंजीत हिचामी हा उराडी ते कढोली मार्गावरून दुचाकीने दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्याच्या दुचाकीवर ५० लिटर मोहफुलाची दारू आढळली.
मंगळवारी कुंभीटोला, सतीनदी घाटाजवळ दुचाकी वाहनाने वाहतूक केली जाणारी १५ लिटर मोहफूल दारू जप्त केली. ओमप्रकाश लाकडे व नागेश तुलावी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोन दिवसांत सहा ठिकाणी कारवाई करीत आठ आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर देडे, सहायक पोलीस निरीक्षक समीर केदार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरूण पारधी, हवालदार, बाबुराव उराडे, गौरीशंकर भैसारे, केवळराम धांडे, रूपेश काळबांधे, प्रेमलाल चौरीकर, राधेश्याम चिखलोंडे, प्रफुल बेहरे, गौरी कुमरे यांच्या चमूने केली.
कोरेगावजवळ दारू जप्त
महागाव नदीघाटातून कोरेगाव मार्गाने दुचाकीने वाहतूक होणारी सुमारे ६० हजार रूपये किमीची देशी दारू जप्त केली आहे. या मार्गाने दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती बोडधा येथील चेक पोस्टवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई संतोष नागरे व होमगार्ड विशाल तुपटे यांना प्राप्त झाली. त्यांनी नदीघाटावर पाळत ठेवली असता, एम. एच. ३३, आर ४४७८ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने पोत्यामध्ये भरून दारूची वाहतूक केली जात होती. ६० हजार रूपये किमीची दारू व ४० हजार रूपये किमतीचे वाहन, असा एकूण एक लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी योगेश माकडे (२६) रा. उदापूर ता. ब्रम्हपुरी याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अशोक कराडे, पोलीस नाईक विजय नंदेश्वर करीत आहेत.