शतकाेत्तर परंपरा असलेला कुरूडचा पोळा उत्सव उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:10+5:302021-09-10T04:44:10+5:30
ग्रामीण भागात यांत्रिकीकरणामुळे बैलाची संख्या झपाट्याने कमी होत आहे; परंतु कुरूड येथे आताही बैलजोड्यांची संख्या ही वाखाणण्याजोगी आहे. विशेष ...
ग्रामीण भागात यांत्रिकीकरणामुळे बैलाची संख्या झपाट्याने कमी होत आहे; परंतु कुरूड येथे आताही बैलजोड्यांची संख्या ही वाखाणण्याजोगी आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी शांततेत हा उत्सव साजरा करण्यात येतो. गाव मोठे असल्यामुळे पाटील मोहल्ला, होळी चौक व झुरे मोहल्ला येथे हा सण साजरा करण्यात आला, सर्व धर्माचे लोक यात सहभागी झाले. तान्हा पोळ्यानिमित्त बालकांना नोटबुक, पेन्सिल, चॉकलेट वितरित करण्यात आले. याप्रसंगी सरपंच प्रशाला गेडाम, माजी सरपंच मनोहर निमजे, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी जि. प. सदस्य सुरेश मेश्राम, विजय कुंभलवार, रमेश ठाकरे, पिंटू पारवेकर, महादेव ढोरे, दीपक चौधरी, विलास ठाकरे, विजय पारधी, विठ्ठल ढोरे, ग्रा. पं. सदस्य विलास पिलारे, आनंदराव झुरे, पटवारी देवताळे, शत्रुग्न झुरे, हरी दरवरी, श्रीहरी दाेनाडकर, ताराचंद पारधी, दादाजी वाटकर, शामराव ढोरे, मधुकर लाभे, नामदेव तुपट, शंकर ढोरे, ईश्वर ढोरे, अशोक कुथे व गावातील नागरिक उपस्थित होते.