तेंदू बोनसपासून मजूर वंचित
By admin | Published: June 2, 2017 01:04 AM2017-06-02T01:04:32+5:302017-06-02T01:04:32+5:30
तालुक्यातील हालेवारा येथील तेंदूपत्ता मजुरांनी २०१६ मध्ये तेंदूपत्ता संकलन ग्रामसभेंतर्गत पेसा कायद्यांतर्गत केले होते.
हालेवारातील मजुरांची मागणी : तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील हालेवारा येथील तेंदूपत्ता मजुरांनी २०१६ मध्ये तेंदूपत्ता संकलन ग्रामसभेंतर्गत पेसा कायद्यांतर्गत केले होते. एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही मजुरांना बोनस वितरित करण्यात आला नाही. गावातील मजूर अद्यापही बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. तत्काळ बोनस वितरित करण्यात यावा, अशी मागणी मजुरांनी तहसीलदार व बीडीओंकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तेंदूपत्त्याची रक्कम मिळावी, यासाठी ग्रामसभेचे अध्यक्ष दसरू नरोटी, सरपंच मोहन मट्टामी, ग्रामसेवक उईके यांना वेळोवेळी मजुरांच्या वतीने विनंती करण्यात आली. तसेच २६ जानेवारी २०१७ ला ग्रामसभेत बोनस वितरणप्रसंगी मुद्दा उपस्थित करण्यात आला. परंतु ग्राम पंचायतीच्या वतीने कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे मजूर अद्यापही बोनसपासून वंचित आहेत. तेंदूपत्ता बोनसच्या रकमेचा अपहार केला की काय, अशी शक्यताही हालेवारा येथील तेंदू मजुरांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुरेश मट्टामी, राजू नरोटी, गावडे, मट्टामी, साधू मट्टामी, उसेंडी, नरोटी, सुकलू मट्टामी, पेका मट्टामी, विलास कोवासे, कोको गावडे, कोको मट्टामी, चमरू हलामी, विष्णू बारसा, अडणे बारसा, पेका गावडे, सकलू दसरू मट्टामी, कोलू गोटा, लक्ष्मण उसेंडी, केसरी मट्टामी, सुकलू मट्टामी, देवाजी हेडो, चिन्ना मट्टामी, नानसू नरोटे, बाजू नरोटे, कोरीले नरोटे, दलसू मट्टामी, सोमा नरोटे, बंडू गेडाम, दिव्या निकोडे, रामलू इपावार, मन्साराम उसेंडी, किशोर गादेवार, डोनू नरोटे, मिसा मट्टामी, चमरू उसेंडी, पेका मट्टामी, दानू मट्टामी, झूरू तलांडे, केवळराम किरंगे, शिवाजी जोगा, सोमजी नरोटी, दानू हेडो, गिरजा नरोटे, रमेश दासरवार, सुधाकर इप्पावार, कुमार जक्कुलवार, लालू मट्टामी, आशिष किरंगे, प्रेमिला शेगमकर, शांती होळी, रमेश दासरवार, कन्ना नरोटे यांच्यासह अन्य मजुरांच्या वतीने करण्यात आली आहे.
दोषींवर कारवाई करा
हालेवारा येथील तेंदूपत्ता मजुरांना एक वर्षाचा कालावधी उलटूनही अद्यापही बोनसची रक्कम मिळाली नाही. सदर रक्कम तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी ग्राम पंचायतीकडे अनेकदा करण्यात आली. परंतु या मागणीकडे सरपंच व ग्रामसेवकांचे दुर्लक्ष झाले. २६ जानेवारीच्या ग्रामसभेत या विषयावर चर्चाही घेण्यात आली. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. परिणामी शंकाकुशंका निर्माण होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तेंदूपत्ता मजुरांच्या वतीने तहसीलदार व संवर्ग विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.